Sangli : सांगलीत शेतकऱ्यांचे नुकसान लाखात, भरपाई दोन-पाच हजारच
सोन्याळ गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत मोठे नुकसान
सांगली : सोन्याळ गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने लाखोचे नुकसान झाले. विशेषतः डाळिंबाचे मोठे नुकसान भाते आहे. मात्र, संबंधित कृषी सहायक आणि तलाठ्याने चुकीच्या पद्धतीने सर्व्हे केल्याने भरपाई फफ दोन ते पाच हजार इतकीच मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच फेर सर्व्हेकरून नाय द्यावा, अन्यथा बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा सरपंच बसवराज तेली यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.
सोन्याळ गावातील डाळिंच, बाजरी, तूर, मुईमूग आणि इतर खरीप पिके पूर्णपणे नष्ट झाली. कृषी सहायक एल. एम. कांबळे यांनी केवळ औपचारिक भेटीपुरते गावात्त येऊन निवडक शेतकऱ्याचिच पंचनामे केल्याचा आरोप आहे. तलाठी सौ. स्नेहा साळुंखे या सर्व्हे कालावधीत गावात फिरकल्याडी नसल्याचेडी म्हणणे आहे चुकीच्या सष्ठमुळे मोठे नुकसान होऊनही अपुरी भरपाई मिळाली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, चार पाच एकरांवरची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली नुकसान लाखो रुपयांचे झाले, पण शासनाकडून दोन ते पाच हजार रुपयांची भरपाई मिळाली एकप्रकारे शेतकऱ्यांची क्रूर वेष्टाव झाली असून याला कांबळे आणि साळुंखे जबाबदार आहेत. त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी भरपाई परत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या निष्क्रीय कारभारावर संतम प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मंडलातील माडग्याळ गावात डेक्टरी २२५०० पर्यंत भरपाई मिळाली आहे मात्र सोन्याळच्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोपडी ग्रामस्थांनी केला आहे.
जिल्हाधिकारी, जिल्ला कृषी अधीक्षक आणि तालुका कृषी अधिकारी जत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत कृषी सहायक कांबळे यांच्यावर तत्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, खातेनिहाय चौकशी करावी, सर्व शेतकऱ्यांचा फेरसर्व्हे करून प्रत्यक्ष नुकसान भरपाई द्यावी, अन्यया बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.