महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतकरी आंदोलकांना पोलिसांकडून धक्काबुक्की

10:51 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कित्तूर येथे महामार्गावरील घटना : तीन शाळकरी मुले जखमी, पोलिसांकडून शेतकरी ताब्यात

Advertisement

बेळगाव : कुलवळ्ळी (ता. कित्तूर) गावासह परिसरातील आठ गावांतील शेतकऱ्यांनी कसणारी जमीन शेतकऱ्यांच्या नावे करावी या मागणीसाठी महामार्ग रोखून आंदोलन केले. दरम्यान, पोलीस व शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली. शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटविताना धक्काबुकी करण्यात आल्याने मोठा वादंग झाला. यामध्ये तीन शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना घडली. पोलिसांच्या वर्तनाबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे जवळपास दोन तास महामार्ग ठप्प झाला होता. कुलवळ्ळी गावासह आठ गावांतील शेकडो एकर जमीन शेतकरी परंपरागत कसत आहेत. मात्र या जमिनीवर इनामदारांकडून दावा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून कसणारी जमीन आपल्या नावे करावी, यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. जमिनीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांच्या नावे जमीन करावी, त्याची हक्कपत्रे देण्यात यावीत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी रास्तारोको केला.

Advertisement

दरम्यान, ही घटना समजताच जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रास्तारोको करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या शाळकरी मुलांनाही सामावून घेतले होते. परिसरातील आठ गावांतील शेतकरी, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलन रस्त्यावरून हटविताना पोलीस व शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली. तर शेतकऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या दरम्यान पोलिसांकडून शाळकरी मुलांवर लाठीहल्ला करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले. शेतकऱ्यांनी रास्तारोकोची भूमिका घेतल्यामुळे पुणे-बेंगळूर महामार्गावर जळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतुकीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनस्थळावरून बाजुला करताना मोठा वादंग झाला. यामध्ये तीन शाळकरी मुले जखमी झाल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली. त्यांना कित्तूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून गंभीर जखमी झाली नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

पोलीसप्रमुखांनी मारला श•t

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी पोलिसांकडून उद्धट वर्तन केले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पोलिसांकडून अडविण्यात आल्याने तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येत होता. तर शेतकऱ्यांना श•t ठोकून पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद आवाज दाखवित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या वर्तनाबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली. याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल. शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

शाळकरी मुलांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणार

महामार्गावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मुलांना ढाल करून रस्त्यावर सोडले होते. त्यामुळे वाहतुकीला रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यावेळी रस्ता मोकळा करताना पोलिसांकडून मुलांवर हल्ला केला असेल तर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करू. या घटनेत तीन मुले जखमी झाली आहेत. तर पोलीस कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला आहे. महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्हा पोलीसप्रमुख  गुळेद यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article