हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने लोकनेत्याला साश्रूनयनानी निरोप
आमदार पी एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात सडोली खालसा येथे अंत्यसंस्कार
चुये /प्रतिनिधी
अमर रहे अमर रहे आमदार पीएन पाटील साहेब अमर रहे अशा घोषणानी सडोली खालसा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन . पाटील सडोलीकर यांना हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जनसागराच्या साक्षीने शेवटचा निरोप देण्यात आला .दुपारी अडीचच्या सुमारास चिरंजीव राजेश पाटील यांनी आमदार पी एन पाटील यांच्या पार्थिवाला भडागणी दिला आणि करवीरवासीयांचा हा लोकनेता अनंतात विलीन झाला .करवीर चे आमदार पी एन पाटील सडोलीकर यांचे गुरुवारी पहाटे दुःखद निधन झाले .तब्बल चार दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या ग्रामदेवताला आपला लोक लोकनेता बरा व्हावा म्हणून साकडे घातले मात्र नी यतीच्या मनात विचित्र ठरले आणि गुरुवारी सकाळी आमदार पी एन पाटील यांची प्राणज्योत मालवली .
सडोली खालसा येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी आमदार पी एन पाटील यांचे पार्थिव दुपारी 12:30 च्या सुमारास त्यांच्या गावी आणण्यात आली. आपल्या लोकनेत्याचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर राधानगरी मार्गावरती सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती प्रत्येकाला आपल्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्याची उत्सुकता अंतकरणातून होती त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती त्या गर्दीतूनच त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून थेट त्यांच्या घरी आणण्यात आले यावेळी त्यांच्या कुटुंबीयांकडून शेवटची ओवाळणी करण्यात आली. साहेबांच्या पार्थिवांचे दर्शन घेताच अनेकांच्यया अश्रूंचा बांध फुटला कार्यकर्ते ढसाढसा रडत होते . त्यांच्या घरासमोर हजारोचा जनसागर उपस्थित होता . यावेळी गावातील महिलांनी आपल्या लाडक्या लोकनेत्या चे साश्रू नयनांनी दर्शन घेतले .त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रक वरती त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आणि अंतयात्रा थेट छत्रपती शिवाजी स्टेडियम पर्यंत काढण्यात आली .अमर रहे अमर रहे आमदार पीएन साहेब अमर रहे अशा घोषणा देतांना निष्ठावंत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले .अंत्ययात्रा सुरू असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांनी , ग्रामस्थांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता आमचा वाघ गेला करवीरचा आधार गेला अशा भावना अनेक युवा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या .
आमदार पी एन पाटील यांच्या घरापासून निघालेली त्यांची अंत्ययात्रा गावच्या मुख्य मार्गावरून थेट छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पोहोचली . यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघातील तसेच पन्हाळा राधानगरी करवीर व कोल्हापूर शहरातून हजारो कार्यकर्त्यांनी मैदान खचाखच भरले होते . अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव ठेवल्यानंतर मुख्यमंत्री व राज्य शासनाच्या वतीने तंत्र व शिक्षण राज्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजू लक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन जिल्हा पोलीस प्रमुख महेद्र पंडीत यांनी आमदार पी एन पाटील यांच्या पार्थिवावरती पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली .
ठिक अडीच वाजता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून आमदार पी एन पाटील यांना सलामी देण्यात आली त्यानंतर मंत्रोचाराच्या साक्षीने आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील राजेश पाटील यांनी पार्थिवाला अग्नी दिला .आणि लाखो कार्यकर्त्यांचा आधारवड असलेला राष्ट्रीय काँग्रेसचा पक्षनिष्ठेचा आदर्श लाभलेला लोकनेता अनंतात विलीन झाला .
यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे विद्यमान खासदार धनंजय महाडिक माजी आमदार उल्हास दादा पवार आमदार धीरज देशमुख दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव योगेश जाधव आमदार ऋतुराज पाटील आमदार प्रकाश आबिटकर आमदार श्रीमती जयश्री जाधव कराडचे आमदार आनंदराव पाटील माजी आमदार चंद्रदीप नरके सांगलीचे विशाल पाटील हुतात्मा समूहाचे नेते वैभव नायकवडी माजी आमदार संपतराव पवार पाटील माजी मंत्री भाऊ अण्णा पाटील संजयबाबा घाडगे राजीव आवळे गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण तौफिक मुल्लांनी माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील बिद्री कारखान्याचे चेअरमन के पी पाटील शाहू सहकार समूहाच अध्यक्ष समरजीत सिंह घाडगे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विजयराव देवणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा जालंदर पाटील बाबासाहेब देवकर आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे जनता दलाचे वसंतराव पाटील भाजपाचे महेश जाधव राहुल चिकोडे हंबीरराव पाटील शिवसेनेचे सुनील मोदी , राहुल खंजिरे सुनील शिंत्रे ,भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष बजरंग पाटील गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे चेतन नरके अमर पाटील अमरीश घाटगे राहूल देसाई सर्वोदय सस्येचे आबा कांबळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी विविध साखर कारखान्यांचे संचालक विविध संस्थांचे तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी यांच्यासह करवीर विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थांनी पार्थिवाचे दर्शन घेतले .
पार्थिव पोचताच सडोली गाव गहिवरला . .
सडोली खालसा ते महाराष्ट्र विधानसभा असा प्रवास करून राज्याच्या राजकारणात पक्षनिष्ठेचा पाईक म्हणून आपला राजकीय दबदबा निर्माण करीत आपल्या नावासमोर सडोलीकर हे नाव देऊन गाव राज्याच्या राजकारणात झळकवणारा आपला लाडका सुपुत्र गेल्याची बातमी कळताच गावात शोककळा पसरली होती त्यामुळे नेहमी राजा सारखा येणारा साहेब आज थेट रुग्नवाहिकेतून निपचिप गावात पोचताच सर्वांच्यांच डोळ्याच्या कडा पाणावल्या अनेकांना अश्रू अनावर झाले क्षणात गावात सन्नाटा पसरला . गावच गहिवरून गेल .
साहेबांना... लाल सलाम
गावच्या राजकारणापासून ते महाराष्ट्राची विधानसभा असो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतो किंवा जिल्हास्तरीय सहकारी संस्थांच्या निवडणुका असो या निवडणुकीत थेट विरोधात गेलेली शेतकरी कामगार पक्षाची मंडळी कार्यकर्ते सुद्धा अंत्यसंस्काराप्रसंगी गहिवरलेले होते अंत्यसंस्कार स्थळी लाल सलाम लाल सलाम स्वर्गवासी आमदार पी एन पाटील यांना लाल सलाम अशा आशयाचा श्रद्धाजली फलक पी एन पाटलांचं अजातशत्रुत्व दाखवून देत होता .
दारोदारी पाण्याची सोय .. साहेबाप्रती कृतज्ञता
सडोली खालसा ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरती प्रत्येक घराच्या दारासमोर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती .यावरूनच आमदार पी एन पाटील यांची कृतज्ञता ग्रामस्थांनी दाखवून दिली .
रखरखत्या उन्हात नेत्यावरील निष्टा :
सकाळी 11:00 पासून वातावरणामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली होती दुपारी अडीच पर्यंत तरी अक्षरशा उन्हाचा पारा प्रचंड चढला होता अशा रखरखत्या उन्हात देखील उन्हाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांनी दाखवलेली निष्ठा निश्चितच निष्ठावंत प्रेमाचे प्रतीक दाखवत होती .
कार्यकर्त्यांची अलोट गर्दी
अंत्यसंस्काराच्या वेळी आमदार पी एन पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच सडोली गावात हजेरी लावली आणि ते संस्काराच्या वेळी प्रचंड गर्दी झाल्याने प्रसंगी पोलीस खात्याला देखील या गर्दीवर नियंत्रण ठेवताना दमछाक व्हावी लागली यावरूनच नेत्यावरील कार्यकर्त्याची निष्ठा किती असेल हे अधोरेकित होते . अंत्यसंस्कारावेळी आपल्या भावना व्यक्त करताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले सामान्यांना आधार देत त्यांची सेवा करीत पक्ष निष्ठेचा आदर्श आमदार पी एन पाटील यांनी दिला .काँग्रेस शिवाय त्यांनी दुसरा कोणताच विचार शेवटच्या श्वासापर्यंत केला नाही .तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले दुसऱ्याला मोठ करणारा नेता म्हणून त्याची ओळख होती . राजकीय स्थित्यंतरे आली .मात्र त्यांनी काँग्रेस शिवाय दुसरा कोणताच विचार केला नाही,कराडचे आमदार आनंदराव पाटील म्हणाले.दिलदार मनाचा माणूस आणि सच्चा मित्र आम्ही गमावलेला आहे .
माजी आमदार संपतराव पवार पाटील म्हणाले.राजकारणातील मूल्ये जपत काँग्रेस पक्षाची त्यांनी तन-मन-धन अर्पून जडणघडण केली . माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले .आमदार पी एन पाटील यांनी जन माणसासाठी काम केले . विशाल पाटील म्हणाले .माजी खासदार प्रकाश बापू पाटील यांच्या निधनानंतर दादा घराण्याचा एकमेव आधार पी एन पाटील साहेब होते,त्यामुळे साहेबांच्या रूपाने आमच्या कुटुंबाचा आधारच गेला,व्ही बी पाटील म्हणाले .निष्ठावंत मैत्री,निष्ठावंत कार्यकर्ता आणि पक्षनिष्ठा कशी जोपासावी याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पी एन पाटील होत .खा. धनंजय महाडीक म्हणाले,राजकारणापेक्षा समाजकारणाला त्यांनी प्राधान्य देऊन जनहित जोपासलं,निष्टावान नेता म्हणून ओळख निर्माण केली,प्रा. जालंदर पाटील म्हणाले,गट तट न मानता शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून काम करण्याची त्यांची पद्धत होती,माजी मंत्री भरमू पाटील म्हणाले,कार्यकर्त्याला आधार देणारा नेता गेल्याने कोल्हापूर जिल्हा पोरका झाला आहे .