For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्चना कामतकडून टेबल टेनिसला निरोप

06:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्चना कामतकडून टेबल टेनिसला निरोप
Advertisement

आर्थिकदृष्ट्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्हे, तर शिक्षणासाठी निर्णय घेतल्याचे केले स्पष्ट

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

अर्चना कामतने वयाच्या 24 व्या टेबल टेनिसचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तिने आर्थिकदृष्ट्या चांगल्या भविष्यासाठी नव्हे, तर आणखी शिक्षण घेण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. भविष्यात ‘वेगळ्या मार्गाने’ देशाची सेवा करण्याचा आणि एक अर्थतज्ञ या नात्याने सार्वजनिक धोरणांना आकार देण्यास मदत करण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जर्मनीकडून उपांत्यपूर्व फेरीत भारताला पराभूत व्हावे लागले होते. त्या लढतीतील एकमेव सामना जिंकलेल्या बेंगळूरच्या या 24 वर्षीय तऊणीने अमेरिकेत पुन्हा विद्यार्थीदशेत प्रवेश केला असून मिशिगन विद्यापीठात ती सार्वजनिक धोरण या विषयात दुसरी पदव्युत्तर पदवी घेत आहे. तिने आधीच आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Advertisement

अर्चनाने अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केलेली असून तिला दोन वर्षांनी भारतात परतून बहुतेककरून एक अर्थतज्ञ म्हणून देशाची सेवा करायची आहे. अर्चनाने सांगितले की, चांगल्या आर्थिक भविष्यासाठी तिने हा निर्णय घेतलेला नाही. कारण तिची काळजी तिला नोकरी दिलेले इंडियन ऑइल, ओजीक्यू व सरकारने घेतलेली आहे. ‘मला नेहमीच टेबल टेनिसइतकाच अभ्यास आवडलेला आहे. मी गेल्या वर्षी मिशिगनमध्ये या अभ्यासक्रमाबद्दल विचारपूस केली होती, पण त्यानंतर आम्ही प्रथमच संघ म्हणून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो. मला त्यावर लक्ष केंद्रीत करायचे होते’, असे ती म्हणाले. आता ऑलिम्पिक संपले आहे, मला आणखी अभ्यास करायचा आहे आणि दोन वर्षांनी भारतात परतून वेगळ्या क्षमतेने लोकांची सेवा करायची आहे. माझ्या निर्णयाचा आर्थिक बाबीशी काहीही संबंध नाही, असे अर्चनाने सांगितले. तिचे आई-वडील नेत्ररोगतज्ञ असून तिचा भाऊ सध्या अमेरिकेत एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करत आहे.

Advertisement
Tags :

.