मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. प्री प्रायमरी विभागासाठी आयोजित या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत नर्सरीची मुले विविध प्रकारच्या 'कार्टून' वेशभूषेत सहभागी झाली तर ज्युनि. के.जी. ची मुले 'आपले मदतनीस' या विषयानुसार दुधवाला, शेफ, शेतकरी, सैनिक, नौसैनिक, नर्स, पोलिस, भाजीवाली, डॉक्टर, टिचर, कचरेवाला, मेकअप आर्टिस्ट, पायलट अशा वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये सहभागी झाली. त्याचप्रमाणे सिनिअर के जी. ची मुले 'उपयोगी वस्तू' या विषयानुसार घडयाळ, बल्ब, पुस्तक, कलर पेन्सिल बॉक्स, बस, टुथपेस्ट, टुथब्रश, पाणी, पेटीएम, गुगलपे, पॉपकॉर्न, सिग्नल, वॉशिंग मशिन, डेटॉल अशा प्रकारे वेगवेगळया वस्तूंच्या भूमिकेत सहभागी झाली. मुलांनी कलाविष्कार सादर करून उपस्थित दर्शकांची वाहवा मिळवली. सदर स्पर्धेसाठी प्रतिथयश कलापरिक्षक श्रीम. पुजा सावंत यांनी परिक्षक म्हणून भुमिका बजावली.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्रीम. सिंड्रेला परेरा, श्रीम. कल्पना निकम, श्रीम. आकाशवाणी सावंत, श्रीम. सेलिन बर्नाड यांनी विशेष मेहनत घेतली तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विदयार्थी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व आभार सहशिक्षिका श्रीम. सिंड्रेला परेरा यांनी मानले.
सी.एस. जिल्हा. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, अध्यक्ष श्री राणीसाहेब श्रीमती. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराजनी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती. अनुजा साळगावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी सदस्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.