खोटी कागदपत्रे जोडून पोलीस पाटील पदावर ! बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण
उमरगा - कलदेव निंबाळा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल डोणगावे यांनी गावातील पोलीस पाटील यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दि 21 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले होते.
या निवेदनानुसार, गावातील पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेले पांडुरंग गुंडेराव पाटील यांनी त्यांचा पदावरील कार्यकाळ संपत असल्याने खोटी बनावट आधार कार्ड बनवून स्वतःचे वय कमी करून घेतले असून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे, व पदाचा गैर वापर करत आहेत.अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी, उमरगा यांच्या कडे अर्ज केला असता अद्याप त्यांच्यावर कोणतेही कार्यवाही झाली नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी पोलीस पाटील पदावर असलेले पांडुरंग गुंडेराव पाटील यांची चौकशी करावी. त्यांनी प्रशासनास खोटी कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी योग्य ती निलंबनाची कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन दि.21 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिले होते. याला दीड महिना उलटला मात्र कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे राहुल डोणगावे यांनी कलदेव निंबाळा ग्रामपंचायत कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.