For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेस्कॉमच्या ट्रान्स्फॉर्मरवर वृक्ष कोसळल्याने नुकसान

10:24 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेस्कॉमच्या ट्रान्स्फॉर्मरवर वृक्ष कोसळल्याने नुकसान
Advertisement

उचगाव : उचगाव जवळील शेतवडीतील ट्रान्स्फॉर्मरवर झाड कोसळल्याने येथील ट्रान्स्फॉर्मर तसेच विद्युत खांब, वायरीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतवडीतील विद्युत पुरवठा खंडित झाला. मात्र उचगाव विभाग हेस्कॉमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने दुऊस्ती करून नवीन खांब उभारुन विद्युत पुरवठा सुरळीत केल्याने उचगाव भागातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उचगाव-कोवाड मार्गानजीकच्या शेतवडीमधील ट्रान्सफॉर्मरवर गुऊवारी सकाळी मोठा वृक्ष कोसळल्याने ट्रान्सफॉर्मरसह खांब जमीनदोस्त झाले. हेस्कॉम कार्यालयाला कळवताच कर्मचाऱ्यांनी वृक्ष बाजूला केला. मोडकळीस आलेले खांब व नव्याने ट्रान्सफॉर्मर बसवून, विद्युत पुरवठा सुरळीत केला. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.