मोठ्या नफावसुलीने शेअरबाजारात पडझड
एक टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण : रिलायन्स प्रभावीत
मुंबई :
भारतीय शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी तिसऱ्या सत्रात मोठ्या प्रमाणात नफा कमाई झाल्यामुळे बीएसई सेन्सेक्सची तब्बल 790 अंकांची घसरण झाली. अशीच स्थिती ही निफ्टीमध्येही दिसून आली. यामुळे दोन्ही निर्देशांकांच्या पडझडीमुळे बाजारात मोठ्या कंपन्यांचे समभागही नुकसानीसह बंद झाले आहेत.
मुख्य कंपन्यांमध्ये बुधवारी रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प, मारुती सुझुकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे नफा वसुलीच्या प्रभावामुळे बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 790.34 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 72,304.88 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 247.20 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 21,951.15 वर बंद झाला आहे.
दरम्यान सरकारी बँका, वाहन क्षेत्र आणि ऑईल व गॅस कंपन्यांचे समभाग हे जवळपास 2 टक्के ते 3.5 टक्क्यांनी घसरुन बंद झाले. यासह नकारात्मक बाजारातील स्थितीमुळे नफा वसुली व गुंतवणूकदारांच्या कामगिरीमुळे बाजारात दबावाचे वातावरण राहिले होते.
बीएसई मिडकॅपचा निर्देशांक 1.8 टक्के आणि स्मॉलकॅपचा निर्देशांक हा 1.9 टक्क्यांनी प्रभावीत झाला होता. याचा प्रभाव हा बाजारावर पडल्याचे दिसून आले. मुख्य कंपन्यांमध्ये बुधवारी सर्वाधिक तेजीत हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, टाटा कंसल्टन्सी आणि टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल यांचा समावेश राहिला होता.
विदेशी बाजारांची स्थिती
आशियातील बाजारांचा विचार केल्यास यामध्ये सियोल हा लाभासह बंद झाला. तर टोकिओ शांघाय आणि हाँगकाँग हा घसरणीत राहिला होता. यावेळी युरोपीयन बाजार अधिककरुन घसरणीत राहिला. जागतिक पातळीवर कच्चे तेल ब्रेंट क्रूड 0.90 टक्क्यांनी घसरुन 82.90 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.