रस्त्यावर उभा केला नकली टोलनाका
सद्यकाळात पैसे कमाविणे सोपे आहे, केवळ कमाईची पद्धत अनोखी असावी. अनेक लोक प्रामाणिकपणे पैसे कमावतात. तर काही लोक इतरांना फसवून, गैरमार्गाने कमाई करत असतात. रशियात देखील अशाच एका इसमाबद्दल खुलासा झाला आहे. या इसमाने 3 वर्षांपर्यत हजारो लोकांची फसवणूक केली. त्याने कमाईचा जो मार्ग निवडला तो अत्यंत अजब होता. या इसमाने रस्त्यावर एक नकली टोलनाका उभारला आणि त्याद्वारे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांकडून पैसे वसूल करत होता. यामुळे केवळ 3 वर्षात हा इसम धनाढ्या ठरला.
रशियात पायटीगॉर्स्क नावाचे शहर आहे. येथे इलिंस्की नावाचे एक बीच असून जे मोज्हाइस्क कालव्यावर निर्मित आहे. या रस्त्यावर एक टोल होता, लोक येता-जाताना टोलचे पैसे देत होते. परंतु 3 वर्षांनी टोल सरकारने नव्हे तर एका फ्रॉड व्यक्तीने उभारला होता असे समोर आले. हा रोड एका हॉलिडे हॉटस्पॉटच्या दिशेने जाणारा होता. याचमुळे तेथे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या अधिक होती. या इसमाने प्रशासनासोबत बीचची सफाई आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा करार केला होता. याचदरम्यान या इसमाने बीचनजीक बूट सेट उभा केला, यानंतर सुरक्षारक्षक नेमले जे लोकांकडून टोल वसूल करत होत. 2021 मध्ये आत शिरण्याचे शुल्क 100 रुबल्स (84 रुपये) होते. 2022 मध्ये 126 रुपये शुल्क झाले. तर 2023 मध्ये 168 रुपयांचे शुल्क आकारले जाऊ लागले. या इसमाला यापूर्वीही अवैध मार्गाने शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. जोपर्यत टोल सक्रीय होता, तोपर्यंत त्याने मोठी कमाई केली.
प्रारंभी टोलबूथला पर्यटकांकडून विरोध करण्यात आला होता. परंतु प्रशासनाला मागील वर्षीच रोड आपल्या अधिकारक्षेत्रात असल्याची जाणीव झाली. हा रस्ता आपल्या जमिनीतून जात असल्याचा दावा इसमाचा होता. या प्रकरणी आता संबंधित इसमाला 8 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.