महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहित धरु नये

01:36 PM Nov 16, 2024 IST | Radhika Patil
Fadnavis should not take the Maratha community for granted
Advertisement

कोल्हापूर : 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना, मराठा समाज बांधवांवर झालेला लाठीमार आणि गोळीबार मराठा समाज विसरलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये अशी स्पष्टोक्ती आमदार सतेज पाटील यांनी केली.

Advertisement

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवारी (16 रोजी) गांधी मैदानावर सभा होत आहे. या ठिकाणी शुक्रवारी आमदार सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मराठा समाज महायुतीच्या बाजूने उभा राहील, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. यावर बोलताना आमदार पाटील यांनी, आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी उपोषण बसले होते. त्यावेळी पोलिसांनी केलेला लाठीमार आणि गोळीबार कोणी केला, हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळ राज्यातला मराठा समाज महायुतीला सहकार्य करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

दरम्यान, विधानसभा प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅग तपासल्या गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्याबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हा केवळ दिखावा असल्याचा आरोप केला. आम्ही कसे निष्पक्ष आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही, त्यांनी केली.

‘बटेंगे तो कटेंगे...एक है तो सेफ है’ असे मुद्दे महायुती सरकारकडून जनतेला गृहीत धरून वक्तव्य केले जात असेल तर जनताच त्यांना जागा दाखवून देईल. असा इशाराही त्यांनी दिला. जनता मतदान करणार आहे. आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होईल असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article