For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समर्थनगर येथे सुविधा पुरविणार

10:37 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
समर्थनगर येथे सुविधा पुरविणार
Advertisement

आमदार राजू सेठ यांची भेट देऊन पाहणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी मंगळवारी समर्थनगर परिसराला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. महिन्याभरापूर्वी येथील नागरिकांनी आमदारांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली होती. ब्रह्मदेव मंदिर, होळी कामाण्णा मंदिर यांच्या बांधकामासोबत, ड्रेनेज पाईपलाईन, पथदीप, कूपनलिका खोदाई करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी बंडू केरवाडकर, मुरली जांगळे, वसंत हलगेकर, प्रकाश राऊत, संजय पाटील, बाळू कोलेकर, मनोज तानावडे यांच्यासह युवक मंडळांनी आमदार सेठ यांचा सत्कार केला. यावेळी समर्थनगर येथील रहिवासी व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.