For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रीडापटूंच्या तंदुरुस्तीसाठी बेळगावात सोय

10:23 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रीडापटूंच्या तंदुरुस्तीसाठी बेळगावात सोय
Advertisement

रिजनहूमन परफॉर्मन्स व हेल्थ सायन्सची पुण्यात स्थापना

Advertisement

बेळगाव : सध्याच्या आधुनिक व जलद युगात क्रीडापटूंनी होत असलेल्या दुखापती व होतकरु क्रीडापटुंना सुदृढ व शारीरिक बाबींची माहिती नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी रिजनहूमन परफॉर्मन्स व हेल्थ सायन्स पुणे या संस्थेने अशा क्रीडापटुंसाठी सुरू केलेल्या केंद्रामुळे होतकरु व दुखापतीने त्रस्त झालेल्या खेळाडूंना याचा नक्कीच लाभ होणार आहे. पुणेबरोबर या केंद्राने बेळगावातही क्रीडापटूंना याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. श्रुती भांदुर्गे यांनी दिली.

हॉटेल उदय भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. रिजनहूमन परफॉर्मन्स व हेल्थ सायन्स पुणे या संस्थेच्या सीईओ डॉ. श्रुती भांदुर्गे म्हणाल्या, या केंद्राचे जून महिन्यात पुणे येथील बानेर येथे सुरू करण्यात आले असून या केंद्रात सर्व खेळातील खेळाडू धावणे, ट्रॅकिंग, फुटबॉल, सेटल बॅडमिंटन, अॅथलेटिक खेळाडू, माऊंटन हिल टॅकिंग आदी खेळातून सहभागी होणाऱ्या खेळाडूंना याचा फायदा होणार आहे. या केंद्रामार्फत प्रारंभी अशा होतकरु खेळाडूंची निवड करुन त्यांच्यातील दोष व कमतरता पाहून त्यांच्यावर प्रशिक्षणाव्दारे इलाज केला जाणार आहे. त्यामुळे त्या खेळाडूंमध्ये कमतरता असलेल्या सर्व बाबी त्याच्या अंगी बिनवून एक तंदुरुस्त खेळाडू निर्माण करण्याचे ध्येय बाळगून या केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.

Advertisement

या केंद्राने बेळगावात एका महाविद्यालयातील खेळाडूंची निवड करुन त्यांची चाचपणी करण्यात आली व त्यांच्यतील कमतरता व त्यांना लागणाऱ्या आधुनिक सुविधा देवून त्या खेळाडूंना पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न त्यांनी केला आहे. पुण्याबरोबर बेळगावातही अशा संस्थांना भेटीगाठी करुन अशा खेळाडूंना प्रोत्साहनाबरोबर त्यांच्या शारीरिक दोषांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी वेगवेगळ्या शारीरिक दुखापतीनुसार  प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत. ते प्रशिक्षक त्या पद्धतीच्या व्यायाम व आहार यांचे नियोजन करुन त्यांना सुदृढ बनविण्याचे काम करीत आहे. त्याच प्रमाणे खेळाडूंनी कोणत्याही प्रकारे आहार व डायट करावा, याचे ज्ञानसुद्धा देण्यात येणार आहे. यावेळी प्रतिक निनावे, श्रेया वाटवे, नील धर्माधिकारी, डॉ. सुनिल भांदुर्गे, डॉ. भांदुर्गे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.