महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वनजमिनींवरील दाव्यांकरिता आलेल्या अर्जांच्या तपासणीला सुऊवात

10:35 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रात येणाऱ्या गावांतील अनुसुचित जाती, जमाती व  वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वनजमिनी मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समिती गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक बैठका, शिबीरे, कार्यशाळा आदिंच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये व लोकांच्यात त्यांच्या हक्क अधिकाराबाबत जागृती करून व धरणे, मोर्चे आदी कार्यक्रम हाती घेऊन शासकीय पातळीवर लोकांच्या मागण्या मांडण्याचे काम वनहक्क संघर्ष समिती करत आहे. या लढ्याचा भाग म्हणून वनहक्क समितीतर्फे दि. 30 मे रोजी  संपतराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. मागील शिबिरात वनहक्कांसाठीच्या दाव्यांचे अर्ज तयार करण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक गावच्या लोकांनी विहित नमुन्यातील आपले अर्ज सोबत आणले होते. तयार झालेले अर्ज यावेळी तपासण्याचे काम हाती घेण्यात आले व त्यात कांही त्रुटी आढळून आल्याने त्या निदर्शनास आणून त्या दुऊस्त करण्याची सूचना केली. महादेव मरगाळे यांनी प्रास्ताविक करून शिबिराचा उद्देश सांगितला. त्यांनी दाव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये जमिनीचे नकाशे, फोटो योग्य पद्धतीने जोडले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी अभिजित सरदेसाई यांनीही आपले विचार मांडले व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी म्हणून सूचना केली. त्यानंतर संपतराव देसाई यांनी उपस्थितांना दाव्यांचे अर्ज परिपूर्ण असणे गरजेचे आहे, असे सांगितले. केश खाचु कुलम यांनी आभार मानले. शिबिराला तळावडे, डोंगरगांव, अबनाळी यासह इतर गावचे शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article