महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्प फाऊंडेशनतर्फे ओलमणीत नेत्रतपासणी शिबिर

09:25 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. या उपक्रमांतर्गत या गावांतील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. फाऊंडेशनने समाज कल्याणासाठी पाऊल टाकत नेत्रदर्शन स्पेशालिटी आय हॉस्पिटलशी सहकार्य केले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 27 नोव्हेंबर रोजी खानापूर तालुक्यातील ओलमणी गावात नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा गावातील सुमारे 85 रुग्णांनी लाभ घेतला. नेत्रदर्शन स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे (डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे युनिट) कर्मचारी उदय, पीआरओ आणि कर्मचाऱ्यांनी नेत्रतपासणी केली. यासाठी लोककल्प फाऊंडेशनचे प्रसाद असुकर, संतोष कदम, अनंत गावडे यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article