महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोस्ट वाँटेड गुन्हेगाराचे युएईतून प्रत्यार्पण

06:22 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हत्या-दंगलीप्रकरणी आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हरियाणातील मोस्ट वाँटेड गुन्हेगाराला सीबीआयने दुबईतून प्रत्यार्पण करत भारतात आणले आहे. या गुन्हेगाराच्या विरोधात हत्या, दंगली आणि अन्य गंभीर गुन्हे नोंद आहेत. याचबरोबर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या गुन्हेगाराचे नाव नरेंद्र सिंह आहे.

सीबीआयचे ग्लोबल ऑपरेशन सेंटर अबुधाबी इंटरपोल एनसीबीच्या संपर्कात होते. गुन्हेगार नरेंद्र सिंहच्या विरोधात यापूर्वी 2023 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. 2009 साली उच्च न्यायालयाने नरेंद्र सिंहला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सीबीआयने आतापर्यंत 39 फरार गुन्हेगारांचे प्रत्यार्पण घडवून आणत  त्यांना भारतात आणले आहे. तर जवळपास 100 रेड कॉर्नर नोटीस आतापर्यंत अनेक फरार गुन्हेगारांच्या विरोधात जारी करविण्यास सीबीआयला यश आले आहे.

नरेंद्र सिंहवर हत्या, दंगल आणि गंभीर ईजा पोहोचविल्याचा गुन्हा नोंद होता. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु तत्पूर्वीच तो विदेशात पळाला होता. हरियाणा पोलिसांच्या विनंतीनुसार सीबीआयने 7 नोव्हेंबर 2023 रोजी त्याच्या विरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करविली होती. नरेंद्र सिंहला अटक करण्यासाठी सर्व इंटरपोल सदस्य देशांना नोटीस प्रसारित करण्यात आली होती. यानंतर त्याला युएईत ताब्यात घेण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article