महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशोत्सव काळात धावणार जादा बस

06:19 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गणेश दर्शनासाठी परिवहनचा निर्णय

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सव काळात शहरांतर्गत विविध मार्गांवर जादा बस सोडण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. दि. 10 ते 16 सप्टेंबर दरम्यान जादा बस धावणार आहेत. अनगोळ, वडगाव, मजगाव, कंग्राळी, सह्याद्रीनगर, येळ्ळूर आदी मार्गांवर ही बससेवा सुरू राहणार आहे.

मुंबई, पुणे पाठोपाठ बेळगावतही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे देखावे सादर केले जातात.  आकर्षक मूर्तींची स्थापना केली जाते. दरम्यान गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी असते. यासाठी गणेशोत्सवकाळात शहरांतर्गत बससेवेत वाढ केली जाणार आहे.

खानापूर, गोकाक, चंदगड, चिकोडी, बैलहोंगल, कोल्हापूर, गोवा आदी ठिकाणाहून गणेशभक्त बेळगावात दाखल होतात. विशेषत: विविध ठिकाणी असलेल्या गणेशाचे दर्शन घेतात. या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरांतर्गत बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article