दिवाळीसाठी धावणार जादा बस
मुंबई, पुणे, बेंगळूर मार्गांवर अतिरिक्त बस
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दिवाळीत अतिरिक्त बससेवा सोडली जाणार आहे. पुणे, मुंबई, बेंगळूर मार्गांवर ही विशेष बससेवा धावणार आहे. 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत तब्बल 40 ते 50 अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत.
दिवाळीच्या सुटीत मूळ गावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यासाठी मुंबई, पुणे, बेंगळूर, गोवा मार्गांवर जादा बस सोडल्या जाणार आहेत. सण-उत्सव काळात परिवहनकडून जादा बस सोडून उत्पन्न वाढविले जाते. याच पार्श्वभूमीवर लांब पल्ल्यासाठी अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या काळात जादा बस धावणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीखातर www.क्srtम्.ग्ह या वेबसाईटवर आगाऊ बुकिंग सुरू आहे. तसेच घरबसल्या तिकीट बुकींग करण्यासाठी नवीन अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. हा अॅप डाऊनलोड करून घरबसल्या बसचे तिकीट बुकींग करणे शक्य आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. मात्र पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि गोवा मार्गांवर महिलांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.