महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

2024 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उच्चाटन निश्चित

06:26 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यप्रदेशच्या सभेत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य : भाजप ओलांडणार 370 चा आकडा

Advertisement

वृत्तसंस्था/ झाबुआ

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मध्यप्रदेशच्या झाबुआमध्ये 7550 कोटी रुपयांच्या विकासप्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले आहे. यादरम्यान त्यांनी राज्याच्या ‘आहार अनुदान योजने’च्या अंतर्गत सुमारे दोन लाख महिला लाभार्थींना मासिक हप्ता देखील वितरित केला आहे. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उच्चाटन होणे निश्चित असल्याचे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी झाबुआ येथे रोड शो देखील केला आहे. केवळ भाजपच लोकसभा निवडणुकीत 370 जागांचा आकडा ओलांडणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मागील काही वर्षांमध्ये मध्यप्रदेशने वेगवेगळे कालखंड पाहिले आहेत. एक डबल इंजिन सरकारचा कालखंड तर दुसरा काँग्रेसच्या शासनकाळातील काळे युग. आता कमी वयाच्या युवांना मध्यप्रदेश कधीकाळी बिमारू राज्य म्हणून ओळखले जायचे हे माहितही नसावे. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर येथील विकासाची दारं खुली झाली. आमच्यासाठी आदिवासी मतपेढी नसून देशाचा गौरव आहेत. आदिवासींचा विकास आणि सन्मान ही मोदीची गॅरंटी आहे. आदिवासींची स्वप्ने हा मोदीचा संकल्प असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना आदिवासी भागांमध्ये शाळांची संख्या कमी असल्याने मुलांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे पाहिले होते. मुख्यमंत्री म्हणून आदिवासी भागांमध्ये नव्या शाळा सुरू करविल्या होत्या. आता आदिवासी मुलांसाठी देशभरात एकलव्य वसतिशाळा सुरू करत आहे. काँग्रेसने अनेक वर्षांमध्ये 100 च एकलव्य शाळा सुरू केल्या होत्या. तर भाजप सरकारने केवळ 10 वर्षांमध्ये 400 हून अधिक नव्या एकलव्या शाळा सुरू करविल्या आहेत. एकही आदिवासी मुलगा-मुलगी शिक्षणाअभावी मागे पडू नये यासाठी आम्ही झटत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

झाबुआमधून मोदी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची चर्चा येथे सुरू होती. परंतु मोदी हा येथे लोकसभा प्रचारासाठी आलेला नाही. मोदी तर सेवक म्हणून ईश्वररुपी मध्यप्रदेशच्या जनता-जनार्दनाचे आभार मानण्यासाठी आला आहे. मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातूनच आगामी लोकसभा निवडणुकीचा कल  स्पष्ट झाला आहे. याचमुळे विरोधी पक्षांचे मोठमोठे नेते देखील 2024 मध्ये 400 पार, पुन्हा एकदा मोदी सरकार असे म्हणत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.

आमचा आदिवासी समुदाय हजारो वर्षांपासून वनसंपदेतून उपजीविका चालवत आला आहे. काँग्रेसच्या काळात आदिवासींच्या अधिकारांवर अनेक बंधने आणली गेली होती. वनसंपदा कायद्यात बदल करत आमच्या सरकारने आदिवासी समुदायाला वनभूमीशी निगडित अधिकार परत मिळवून दिले आहेत. आदिवासी परिवारांमध्ये सिकल सेल अॅनीमिया दरवर्षी शेकडो लोकांचा जीव घेत होता, काँग्रेसला येथील मुलांची चिंता नव्हती. परंतु आमच्यासाठी मत नव्हे तर लोकांचे जीवन महत्त्वपूर्ण आहे. आदिवासी समुदायाच्या  आरोग्यासाठी आम्ही सिकल सेल अॅनीमिया विरोधात अभियान सुरू केले. काँग्रेस आणि आमच्या वृत्तीत हाच फरक आहे. आमचे सरकार मध्यप्रदेशात आधुनिक पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देत असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article