For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परराष्ट्रमंत्री जयशंकर फ्रान्सच्या दौऱ्यावर

06:26 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
परराष्ट्रमंत्री जयशंकर फ्रान्सच्या दौऱ्यावर
Advertisement

राफेलसंबंधी मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर चालू आठवड्यात फ्रान्सला भेट देणार आहेत. परराष्ट्रमंत्री 8 जून ते 14 जून दरम्यान युरोप दौऱ्यावर असून या काळात ते फ्रान्स व्यतिरिक्त युरोपियन युनियन आणि बेल्जियमलाही भेट देतील. फ्रान्समध्ये जयशंकर हे राफेल लढाऊ विमानांबद्दल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करणार आहेत. फ्रेंच खासदाराच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी जयशंकर फ्रान्सला जात आहेत. अलिकडेच चीन आणि पाकिस्तान या देशांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान राफेल पाडल्याचा दावा केला होता. मात्र, पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात एकही राफेल पडले नसल्याचा खुलासा भारताने यापूर्वीच केला आहे. तरीही राफेल विमानाशी संबंधित बोलणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.