For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधिकाऱ्यांच्या व्यापक बदल्या

10:01 AM Feb 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोलीस अधिकाऱ्यांच्या व्यापक बदल्या
Advertisement

लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी; बेळगाव शहर-जिल्ह्यातील बहुतेक अधिकाऱ्यांचा समावेश : गुलबर्गा, विजापूर जिल्ह्यात बदल्या

Advertisement

बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील 13 पोलीस उपअधीक्षक, 278 पोलीस निरीक्षक व उत्तर विभागातील 176 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचा हा आदेश जारी झाला असून बेळगाव शहर व जिल्ह्यातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर शेखरप्पा एच. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील बहुतेक पोलीस निरीक्षकांच्या गुलबर्गा, विजापूर आदी जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत.

एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी यांची गुलबर्गा शहर वाहतूक विभागात, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांची गुलबर्गा चौक पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी यांची गुलबर्गा ग्रामीण पोलीस स्थानकात तर मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश द्यामण्णावर यांची विजापूर येथील गांधी चौक पोलीस स्थानकात बदली झाली आहे. शहर सीईएनचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांची विजापूर महिला पोलीस स्थानकात, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांची हुबळी-धारवाड येथील विद्यानगर पोलीस स्थानकात, बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांची पीटीएस खानापूर येथे तर सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांची विजापूर येथील सीईएन पोलीस स्थानकात बदली झाली आहे. सीसीआरबी विभागाचे आर. आर. पाटील यांची मुधोळ पोलीस स्थानकात, वाहतूक उत्तरचे श्रीशैल गाभी यांची बेळगाव येथील डीसीआरई विभागात, शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांची डीएसबी बागलकोट येथे, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक तुकाराम निलगार यांची डीएसबी विजापूर येथे, वाहतूक दक्षिणचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांची गुलबर्गा येथील अशोकनगर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.

Advertisement

गुलबर्गा येथील सीसीबीचे दिलीपकुमार सागर यांची उद्यमबाग पोलीस स्थानकात, शहाबाद ग्रामीणचे जगदेवाप्पा यांची वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात, चित्तापूरचे चंद्रशेखर यांची शहापूर पोलीस स्थानकात, बिदर येथील डीसीआरबीचे गाळ्याप्पा पेनग यांची सीसीबी विभागात तर बिदर ग्रामीणचे मल्लिकार्जुन यातनूर यांची शहर एसबी विभागात बदली झाली आहे. गुलबर्गा येथील वाहतूक विभागाचे ख्वाजा हुसेन यांची एपीएमसी पोलीस स्थानकात, विजापूर गांधी चौक पोलीस स्थानकाचे प्रदीप तलकेरी यांची मार्केट पोलीस स्थानकात, गुलबर्गा येथील चौक पोलीस स्थानकाचे राघवेंद्र यांची खडेबाजार पोलीस स्थानकात, विजापूरचे सीईएन विभागाचे रमेश आवजी यांची जिल्हा सीईएन विभागात, तर गुलबर्गा येथील सीईएन विभागाचे सोमलिंग किरेदळ्ळी यांची शहर सीईएन विभागात बदली झाली आहे. जिल्हा सीईएन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची पीटीएस खानापूर येथे तर जिल्हा महिला पोलीस ठाण्याचे सुनील पाटील यांची इंडी ग्रामीण पोलीस स्थानकात, डीसीआरबी विभागाचे प्रल्हाद चन्नगिरी यांची वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात, बागलकोट येथील डीएसबी विभागाचे गुरुशांत दाशाळ यांची हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात नियुक्ती झाली आहे.

बदली झालेल्या अन्य अधिकाऱ्यांची नियुक्त ठिकाणे...

अब्दुल वाजिद पाटील (मुडलगी पोलीस ठाणे), अरुणकुमार (रायबाग), रायगोंडा जनार (गोकाक), हसनसाब मुल्ला (चडचण), महादेव शिरहट्टी (यमकनमर्डी), चन्नकेशव टिंगरीकर (आयजीपी कार्यालय), नचिकेत जनगौडा (बेळगाव ग्रामीण), नागय्या काडदेवर (चिकोडी), सुरेश बंडेगुंबळ (सौंदत्ती), रामचंद्र नायक (खानापूर), मल्लाप्पा हुगार (बैलहोंगल), जयंत गवळी (हुक्केरी), मलकाजाप्पा दप्पीन (कित्तूर), उमेश एम. (काकती), इम्रान बेग (सीसीआरबी बेळगाव), केशवमूर्ती एन. एन. (बेळगाव शहर महिला पोलीस ठाणे), कपिलदेव गाडद (टिळकवाडी).

Advertisement
Tags :

.