राज्य नाट्य स्पर्धेची प्रवेशिका भरण्यास मुदतवाढ
15 नोव्हेंबरपर्यंत इच्छुक संघांनी प्रवेशिका सादर कराव्यात
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या वर्गवारीसाठी प्रवेशिका 6 नोव्हेंबर सादर करावयाची होती. काही संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संघानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी सूचना सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली होती. या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. या मुदतवाढ निर्णयाच्या अनुषंगाने, राज्य नाट्य स्पर्धेतील हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग बालनाट्या, बालनाट्या या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेले संघांनी ऑनलाइन पद्धतीने 15 नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करावी. जानेवारी 2024 पासून या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, संबंधित संघानी https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.