For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फळ पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी

05:57 PM Nov 30, 2023 IST | अनुजा कुडतरकर
फळ पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी
Advertisement

शिक्षणमंत्र्यांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

शासनाच्या फळ पिक विमा २०२३-२४ योजने अंतर्गत पिक विमा भरणेसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

Advertisement

आंबा काजु फळ पिक विमा (२०२३-२४) भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ ठेवण्यात आली आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने व तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी रखडल्या आहेत. शेतकरी बागायतदार यांना पिक विमा भरण्यासाठी ई पीक पाहणीमध्ये पिकांची नोंद करणे आवश्यक आहे त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बरेच शेतकरी पिक विमा या योजनेचा लाभा पासून वंचित राहीलेले आहेत. पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना अजुन कालावधी लागणार आहे. तरी अशा वचित राहीलेल्या शेतकरी बागायतदारांना सन २०२३-२४ अंतर्गत पिक विमा भरण्यासाठी अजुन काही दिवस मुदतवाढ देण्यात यावी जेणे करुन या योजनेच्या लाभापासुन शेतकरी वंचित राहणार नाही. तरी फळ पिक विमा योजनेस मुदत वाढ देण्यात यावी असे केसरकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

.