For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदारयादी उजळणीसाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

01:26 PM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
मतदारयादी उजळणीसाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
Advertisement

सुमारे 17 हजार अर्ज येणे बाकी

Advertisement

पणजी : गोव्यातील मतदारयादी उजळणी (एसआयआर) मुदत 11 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून आता त्या मुदतीत मतदार अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी ती मुदत 4 डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती. दरम्यान, उजळणीसाठी वितरित करण्यात आलेले 98.75 टक्के अर्ज परत प्राप्त झाल्याची माहिती गोवा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 11,85,034 मतदार अर्ज वितरित करण्यात आले होते. त्यातील 11,70,267 अर्ज परत आले असून त्याची डिजिटल नोंदणी पूर्ण झाली आहे. सुमारे 17 हजारच्या आसपास अर्ज परत येणे बाकी आहे. ते यावेत म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित बीएलओनी या मुदतीत उर्वरित शिल्लक राहिलेले अर्ज भरुन ते 11 डिसेंबरपर्यंत सादर करावेत, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. गोव्यातील एसआयआर 100 टक्के पूर्ण होण्याची खात्री सीईओ कार्यालयाने वर्तवली आहे. ज्या नावांचे अर्ज एसआयआरच्या माध्यमातून परत येणार नाहीत त्यांची नावे मतदारयादीतून गाळली जातील, असे सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.