For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रालोपकडून दोन नेत्यांची हकालपट्टी

05:28 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
रालोपकडून दोन नेत्यांची हकालपट्टी
Advertisement

हनुमान बेनीवाल यांचा पक्ष

Advertisement

स्वत:च्या फायद्यासाठी कुणी पक्षांतर करतात तर काही जण बंडखोर म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरत असतात. भाजप आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे किंवा बंडखोरी केल्याचे दिसून आले आहे. परंतु याचदरम्यान हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षात एक अजब घटनाक्रम दिसून आला आहे. एका नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रालोपमधून त्याची हकालपट्टी करण्यात आली. तर दुसऱ्या उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता 3 डिसेंबरला जनता पक्षाला साथ देणार का उमेदवाराला हे कळू शकणार आहे.

...........हकालपट्टी

Advertisement

सरदारशहर मतदारसंघात रालोपने लालचंद मूंड यांना उमेदवारी जाहीर केली होती. मूंड यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत रालोपच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवत 47 हजार मते मिळवून दुसरे स्थान मिळविले होते. परंतु यावेळी मूंड यांनी अपक्ष उमेदवार राजकरण चौधरी यांना समर्थन देत स्वत:चा अर्ज मागे घेतला आहे. मूंड यांच्या या पावलामुळे हनुमान बेनीवाल नाराज झाले आहेत. बेनीवाल यांनी लालचंद मूंड यांना रालोपमधून बाहेर काढले आहे. मूंड यांनी धनबळाच्या प्रभावात येत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा प्रकार लोकभावनांच्या विरोधात असल्याचा आरोप बेनीवाल यांनी केला आहे.

डूडी यांची हकालपट्टी

रालोपने एकूण 86 उमेदवार राजस्थानात उभे केले होते. बाडमेर मतदारसंघात जोगाराम डूडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डूडी यांना स्वत:चा अर्ज दाखल केला. परंतु नंतर पक्ष अध्यक्ष बेनीवाल यांनी जोगाराम डूडी यांना अपक्ष उमेदवार प्रियांका चौधरी यांच्या समर्थनार्थ अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला, परंतु डूडी यांना स्वत:चा अर्ज मागे घेतला नाही. बेनीवाल यांनी याला शिस्तभंग मानून जोगाराम डूडी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. एकीकडे जोगाराम हे निवडणूक मैदानात आता पक्षाच्या नावावरच मते मागत आहेत. दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अपक्ष उमेदवार प्रियांका चौधरी यांच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत.

Advertisement
Tags :

.