महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन माजी आमदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी

07:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

छत्तीसगडमधील घटना : पक्षविरोधी वक्तव्य भोवले

Advertisement

वृत्तसंस्था /रायपूर

Advertisement

काँग्रेसने दोन माजी आमदारांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. माजी आमदार डॉ. विनय जयस्वाल आणि बृहस्पत सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर गंभीर आरोप केले होते. माजी आमदारांच्या वक्तव्यावरून पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता हकालपट्टीची कार्यवाही तत्काळ प्रभावाने करण्यात आली आहे. पक्षाच्या दोन माजी आमदारांनी छत्तीसगड विधानसभा निवडणूक-2023 च्या निकालानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि छत्तीसगड प्रभारी यांच्यावर सार्वजनिकपणे केलेले आरोप तथ्यहीन आणि निराधार आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने पक्षेनतृत्त्व असमाधानी आहे, असे छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे. साहजिकच छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार, 14 डिसेंबर 2023 रोजी माजी आमदार डॉ. विनय जयस्वाल यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच माजी आमदार बृहस्पत सिंग यांचीही सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article