महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्सच्या ध्वजाला सैतानी ठरविणाऱ्या इमामची देशातून हकालपट्टी

06:33 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काहीही करण्याची अन् बोलण्याची सूट नाही

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

ट्युनीशियाचे मुस्लीम धर्मगुरु इमाम महजौब महजौबी यांना फ्रान्सच्या ध्वजावर टिप्पणी करणे महागात पडले आहे. महजौबी यांना फ्रान्समधून हाकलण्यात आले आहे. यासंबंधीची घोषणा अंतर्गत मंत्री गेराल्ड डर्मैनिन यांनी केली आहे. महजौबी यांनी फ्रान्सच्या ध्वजाला सैतानाचा ध्वज ठरविले होते.

कट्टरवादी इमाम महजौब महजौबी यांना अटक झाल्याच्या 12 तासांच्या आत राष्ट्रीय क्षेत्रातून हाकलण्यात आले आहे. फ्रान्समध्ये काहीही करण्याची आणि काहीही बोलण्याची अनुमती दिली जाणार नसल्याचे डर्मैनिन यांनी म्हटले आहे.

बैगनॉल्स-सुर-सीजमध्ये एटाउबा मशिदीत कार्यरत मुस्लीम मौलवीने स्वत:च्या वक्तव्यांचा बचाव केला आहे. माझ्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी कधीच फ्रान्सच्या ध्वजाचा अनादर केला नसल्याचे महजौबी यांनी म्हटले आहे. फ्रान्स सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आता महजौबी हे न्यायालयात धाव घेणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article