महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशाची निर्यात वाढली

07:00 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयातही वधारली : सरकारी आकडेवारीमधून माहिती

Advertisement

नवी दिल्ली : देशाची निर्यात सप्टेंबरमध्ये 34.58 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली, आयातीतही वाढ झाली आहे. भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात सप्टेंबरमध्ये किरकोळ वाढून 34.58 अब्ज डॉलरची झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 34.41 अब्ज डॉलरवर राहिली होती. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2023 मधील 54.49 अब्ज डॉलरवरून सप्टेंबरमध्ये आयात 1.6 टक्क्यांनी वाढून 55.36 अब्ज डॉलरवर राहिली आहे. समीक्षाधीन महिन्यात व्यापार तूट (आयात आणि निर्यातीमधील अंतर) 20.78 अब्ज डॉलरची होती. भारताच्या व्यापारी मालाची निर्यात ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर 9.3 टक्क्यांनी घसरली आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) निर्यात एक टक्क्याने वाढून 213.22 अब्ज डॉलरची झाली आहे, तर आयात 6.16 टक्क्यांनी वाढून 350.66 अब्ज डॉलरची  झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article