For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चालू आर्थिक वर्षात निर्यात 450 अब्ज डॉलर्सपर्यंत शक्य

06:41 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
चालू आर्थिक वर्षात निर्यात 450 अब्ज डॉलर्सपर्यंत शक्य
Advertisement

एफआयइओ अध्यक्ष अश्वनी कुमार यांचे भाकीत  : लाल समुद्राच्या संकटाप्रमाणे राजकीय आव्हानेही

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

लाल समुद्राच्या संकटासारखी भौगोलिक राजकीय आव्हाने असूनही, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशाची व्यापारी मालाची निर्यात 450 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. निर्यातदारांची सर्वोच्च संघटना असलेल्या एफआयईओचे अध्यक्ष अश्वनी कुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

Advertisement

ते म्हणाले की, लाल समुद्राच्या संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांवर सागरी विमा आणि मालवाहतूक शुल्कात तर्कशुद्ध वाढ करून मार्ग काढला जाऊ शकतो.

कुमार म्हणाले की, देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात क्षेत्राला सुलभ आणि कमी किमतीत कर्ज आणि विपणन सहाय्याची आवश्यकता आहे. ब्रिटन आणि ओमानसोबतच्या मुक्तव्यापार करारांना लवकर अंतिम रूप दिल्याने निर्यातीलाही मदत होईल.

‘एमएसएमईच्या समस्या सोडवण्यावर मी लक्ष केंद्रित करेन कारण ते आगामी काळात निर्यातीत प्रमुख भूमिका बजावणार आहेत.’ 2030 पर्यंत 1,000 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी मालाच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यात या युनिट्स महत्त्वाची भूमिका बजावतील असेही अश्वनी कुमार यांनी स्पष्ट केले आहे. लहान आणि मध्यम युनिट्स हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांना काही पतसंबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. मी बँकांना या युनिट्सना सहकार्य देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करेन. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणाले की संघटना लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका सारख्या प्रदेशात निर्यातदारांसाठी अधिक संधी शोधण्यावर देखील काम करत आहे.

आव्हानांवर मात करणार

आव्हाने आहेत, पण मला खात्री आहे की चालू आर्थिक वर्षात आम्ही  450 अब्ज डॉलरची निर्यात करू, असा विश्वासही कुमार यांनी व्यक्त केला आहे. समस्या असूनही, फेब्रुवारीमध्ये निर्यात सुमारे 12 टक्क्यांनी वाढून  41.40 अब्ज डॉलरची झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-फेब्रुवारी दरम्यान मालाची निर्यात 395 अब्ज डॉलर्सची राहिली आहे.

Advertisement
Tags :

.