महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संरक्षणमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी काश्मीरमध्ये स्फोटके जप्त

06:35 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रीनगर-बारामुल्ला महामार्गाजवळ सापडलेली आयईडी नष्ट करण्यात यश

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावरील लावेपोरा येथे आयईडी स्फोटके सापडल्याने बुधवारी खळबळ निर्माण झाली. चिनार कॉर्प्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी लावेपोरा येथे आयईडी जप्त करून नष्ट केल्याने दहशतवादी घातपाताची मोठी घटना टाळली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जात असताना हा प्रकार घडला आहे. आपल्या दौऱ्यात संरक्षणमंत्री जम्मू आणि राजौरीला भेट देणार आहेत.

श्रीनगरमधील लावेपोरा भागात एक रहस्यमय वस्तू सापडल्यानंतर सुरक्षा दल आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी भारतीय लष्कराविऊद्धच्या हल्ल्यांमध्ये चिनी बनावटीची शस्त्रे आणि संभाषण उपकरणांचा वापर करत आहेत. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारखे गट आपल्या कारवायांमध्ये चिनी शस्त्रे, बॉडी पॅमेरे आणि संभाषण साधने वापरत आहेत. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.

जम्मूमध्ये अतिरिक्त सुरक्षा ब्रिगेड

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अलीकडच्या काळात सैनिकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना, पूंछ-राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्यदलाची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. काही महिन्यांपूर्वी या भागात अतिरिक्त ब्रिगेडची स्थापना करण्यात आली होती. दहशतवादविरोधी कारवायांचे समर्थन करण्यासाठी आणखी काही तुकड्यांसह आणखी एक ब्रिगेड तेथे येईल अशी योजना आहे.

जखमींची विचारपूस

जम्मू-काश्मीरमधील गेल्या आठवड्यात पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बुधवारी राज्याच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. पूंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मूला पोहोचले. या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले असून तीन जण जखमी झाले. सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर गोळीबार करत हल्ला केला होता. आपल्या दौऱ्यादरम्यान राजनाथ यांनी जखमी सैनिकांची भेट घेत विचारपूस केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article