महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेंगळुरात कॅफेमध्ये स्फोट

06:56 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘आयईडी’द्वारे घातपाताचा कट : 9 जण जखमी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

बेंगळूरच्या कुंदलहळ्ळी गेट परिसरातील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे हॉटेलमधील साहित्याच्या ठिकऱ्या उडाल्या तर 9 जण जखमी झाले. अज्ञात व्यक्तीने ठेवलेल्या बॅगेतील आयईडीचा स्फोट झाल्याची  माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. घातपात घडविण्याच्या हेतूने हा स्फोट घडवून आणला का? याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे बेंगळूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जलदगतीने तपास करण्यासाठी हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

 

शुक्रवारी दुपारी 12:30 च्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कॅफेच्या कॅशियरजवळ बॅग ठेवली. बॅग ठेवल्यानंतर 12.55 च्या सुमारास स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. स्फोटानंतर कॅफेमध्ये धूर पसरला तर 30 हून अधिक ग्राहकांनी बाहेर धाव घेत बचाव करून घेतला. बॅगेत आयईडी  -सुधारित स्फोटक सामुग्री), टायमर, बॅटरी व इतर सामुग्री सापडल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. स्फोटानंतर कॅफेत नट-बोल्ट, पांढऱ्या रंगाची पावडर, बॅटरी व इतर लोखंडी साहित्य आढळले आहे. जखमींमध्ये कॅफेमधील 3 कर्मचारी, फुड पार्सल सेवा देणारा कर्मचारी व पाच ग्राहकांचा समावेश आहे. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या एका महिलेली प्रकृती चिंताजनक आहे.

एनआयएच्या पथकाचीही घटनास्थळी पाहणी

स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर बॉम्बशोध पथक, श्वानपथक आणि ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा केले. एनआयएच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्फोट घडविण्यासाठी मोबाईलचा वापर झाला असावा, असा संशय आहे.

संशयिताचा शोध जारी

प्रारंभी गॅस सिंलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, घटनास्थळी आढलेल्या वस्तू आणि कॅफेमधील सिंलिंडर व गॅस पाईपलाईन सुस्थितीत असल्याचे आढळले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर कॅफेमध्ये संशयास्पद व्यक्ती बॅग घेऊन आल्यानंतर स्फोट झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे संशयित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

10 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट

रामेश्वरम कॅफेच्या सहसंस्थापक दिव्या राव यांनी कॅफेमध्ये 10 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाल्याचे सांगितले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन वेळा स्फोट झाल्याचे आढळले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी सिलिंडर नव्हते. कॅफेतील सर्व सिलिंडर सुरक्षित आहेत.

नेमके कारण अद्याप अस्पष्ट : पोलीस महासंचालक

स्फोटामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक लॅबच्या टीमकडून तपासणी केली जात आहे. या टीमकडून अहवाल आल्यानंतर स्पष्ट माहिती मिळेल. घटनेला कारणीभूत असलेल्या आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील, अशी प्रतिक्रिया राज्य पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article