For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॅटरी प्रकल्पात स्फोट; द. कोरियात 20 ठार

06:45 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॅटरी प्रकल्पात स्फोट  द  कोरियात 20 ठार
Advertisement

वृत्तसंस्था/ सेऊल

Advertisement

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथील लिथियम बॅटरी निर्मिती कारखान्यात सोमवारी सकाळी झालेल्या स्फोटानंतर आग लागली. स्थानिक वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या दुर्घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काही लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन अधिकारी किम जिन योंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता आग लागली. काही तासांनंतर ही आग आटोक्मयात आणण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.