कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुर्कियेत शस्त्रास्त्र कारखान्यात स्फोट, 12 ठार

06:02 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्तंबुल :

Advertisement

तुर्कियेच्या उत्तर-पश्चिम भागात एका शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात मंगळवारी सकाळी विस्फोट झाला असून यात 12 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत.  हा विस्फोट बालिकेसिर प्रांतातील कारखान्याच्या कॅप्सूल उत्पादन केंद्रात झाला आहे. विस्फोटामुळे कॅप्सूल उत्पादन केंद्राची इमारत उद्ध्वस्त झाली असून आसपासच्या इमारतींचेही नुकसान झाल्याची माहिती बालिकेसिरचे गव्हर्नर इस्माइल  उस्ताओग्लू यांनी दिली आहे.  तर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्याचे नाव झेडएसआर अॅम्युनिशन प्रॉडक्शन फॅक्ट्री आहे. तर प्रकल्पातील विस्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement

स्फोटानंतर कारखान्याची इमारत कोसळल्याने अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. तपास यंत्रणांकडून विस्फोटाच्या कारणांचा तपास केला जात आहे. तर घटनास्थळी मदत अन् बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article