For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाग पेन

06:13 AM Feb 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाग पेन
Advertisement

सर्वसाधारणपणे आपण दैनंदिन जीवनात 10-12 रुपयांच्या पेनचा वापर करतो. परंतु जगात काही असे पेन आहेत, ज्याची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. हे पेन केवळ आकर्षक डिझाइनमध्ये नसून त्यात अनेक मूल्यवान हिरे अन् रत्नं जडविलेली असतात.

Advertisement

फुलगर नोक्टारनस : 70 कोटी रुपये

इटलीच्या टिबाल्डी कंपनीचे हे पन जगातील सर्वात महाग पेत आहे. 2020 मध्ये शांघाय येथे झालेल्या एका लिलावात याची विक्री झाली होती. यात 945 काळे हिरे आणि 123 रुबी जडविण्या तआले असून याची निब 18 कॅरेट सोन्याने तयार करण्यात आली आहे. याची किंमत 80 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 70 कोटी रुपये आहे.

Advertisement

मोंट ब्लांक ताजमहाल लिमिटेड एडिशन : 17.35 कोटी

मेंट ब्लाकचे हे पेन मुगल वास्तुकलेच्या भव्यतेला दर्शविते. जगात केवळ 10 अशी पेन्स उपलब्ध आहेत. यात हिरे, निलम आणि मालाकाइट लावण्यात आले असून याचे डिझाइन ताजमहालने प्रेरित आहे. याची किंमत 20 लाख डॉलर्स म्हणजेच 17.35 कोटी रुपये आहे.

मिस्ट्री मास्टरपीस : 6.33 कोटी रुपये

2006 मध्ये मोंट ब्लांक ाअणि वॅन क्लीफ अँड अर्पेल्सने मिळून या पेनचे डिझाइन केले होते. यात 840 हिरे आणि 20 कॅरेटचा नीलम आणि रुबी जडविलेला असतो. याची किंमत 7.3 लाख डॉलर्स म्हणजेच 6.33 कोटी रुपये आहे.

कारन डाश 1010 डायमंड एडिशन : 8.91 कोटी

स्वीत्झर्लंडची कंपनी कारन डाशचे हे पेन 850 हून अधिक हिऱ्यांनी जडविण्यात आले आहे. याचे डिझाइन घड्याळाच्या गियरने प्रेरित आहे. याची किंमत 10.28 लाख डॉलर्स म्हणजेच 8.91 कोटी रुपये ओह.

मोंटेग्रप्पा ड्रॅगन ब्रूस ली सेट : 2.5 कोटी रुपये

हे पेशन मार्शल आर्ट लीजेंड ब्रूस लीला समर्पित आहे. यात काळ्या ाअणि पांढऱ्या हिऱ्यांनी निर्मित ड्रॅगन कोरण्यात आला आहे. या सेटमध्ये फाउंटेन पेन, बॉलपॉइंट पेन आणि एक क्रिस्ठल इंकबॉटल सामील आहे. याची किंमत 2.9 लाख  डॉलर्स म्हणजेच 2.5 कोटी रुपये आहे.

डियामंते : 12.75 कोटी रुपये

इटालियन ब्रँड ऑरोराच्या या पेनला 1919 डी बीयर्स हिऱ्यांनी जडविण्यात आले आहे. याच्या निर्मितीकरता 2 वर्षे लागतात आणि दरवर्षी केवळ एकच पेन तयार केले जाते. याची किंमत 14.7 लाख डॉलर्स म्हणजेच 12.75 कोटी रुपये आहे.

हेवन गोल्ड : 8.63 कोटी रुपये

केवळ 8 युनिटमध्ये निर्मित या पेनमध्ये 1888 हिरे जडविलेले आहेत आणि याचे डिझाइन प्राचीन चिनी संस्कृतीने प्रेरित आहे. याची किंमत 9.95 लाख डॉलर्स म्हणजेच 8.63 कोटी रुपये आहे.

मोंट ब्लांक बोहेम रॉयल : 13 कोटी रुपये

18 कॅरेट पांढऱ्या सोन्याने निर्मित हा पेन 1430 हिऱ्यांनी जडविलेले आहे. याची क्लिप पॅरामाउंट-कट हिऱ्याने निर्मित आहे. याची किंमत 15 लाख डॉलर्स म्हणजेच 13 कोटी रुपये आहे.

मोंट ब्लांक जोहान्स केपलर हाय आर्टिस्ट्री स्टेला नोवा : 13 कोटी

महान खगोलशास्त्रज्ञ जोहान्स केपलर यांच्या सन्मानार्थ निर्मित या पेनमध्ये 5,294 नीलम आणि 570 हिरे जडविण्यात आले आहेत. यामुळे हे आकाशाप्रमाणे चमकते. याची किंमत 15 लाख डॉलर्स म्हणजेच 13 कोटी रुपये आहे.

कारन डाश गोथिका पेन : 3.52 कोटी रुपये

गॉथिक आर्ट आणि आर्किटेक्छारने प्रेरित या पेनचे डिझाइन स्वीत्झर्लंडमध्ये तयार करण्यात आले आहे. यात रंगबिरंगी फूले आणि खिडक्यांसारखे डिझाइन कोरण्यात आले आहे. याची किंमत 4.06 लाख डॉलर्स म्हणजेच 3.52 कोटी रुपये आहे.

Advertisement
Tags :

.