कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दफनभूमीला दिले जिमचे स्वरूप थडग्यांदरम्यान करते एक्सरसाइज

06:38 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सध्या जिममध्ये जाण्याचा प्रकार पुन्हा वाढला आहे. लोक स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देत असून स्लिम होण्यासाठी जिमची सेवा मिळवत आहेत. परंतु तुम्ही कधी बंदिस्त हॉलमधील जिम सोडून दफनभूमीत जात एक्सरसाइज कराल का? लंडनमध्ये राहणारी एक ब्राझीलची मॉडेल मात्र हे करत आहे. ती जिम सोडून देत दफनभूमीत थडग्यांदरम्यान जात ग्लॅमरस शैलीत एक्सरसाइज करते आणि इतरांनाही प्रशिक्षण देते.

Advertisement

Advertisement

एंड्रिया सनशाइलन एक बॉडीबिल्डर असून ती आता आजी झाली आहे. तरीही ती अत्यंत फिट आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहे. एंड्रिया अनेकदा सोशल मीडियावर स्वत:चे ग्लॅमरस व्हिडिओज पोस्ट करत असते, ज्यात ती जिममध्ये अत्यंत अवघड ट्रेनिंग करताना दिसून येते, तिचा फिटनेस पाहून युवाही चकित होऊन जातात.

परंतु एंड्रियाने आता जिम सोडून देत दफनभूमीत जात एक्सरसाइज करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन शहराच्या जिममधील लोकांचे टोमणे आणि छेडछाड यामुळे ती वैतागून गेली होती. अनेकदा पुरुष माझ्या लुक्समुळे त्रस्त व्हायचे. यामुळे एकट्यानेच दफनभूमीत येत ट्रेनिंग करणे सुरू केले. प्रारंभी मला ग्लॅमरस अवतारात दफनभूमीत येत ट्रेनिंग करण्यास मज्जाव करण्यात आला होता, परंतु आता मी येथे रुळले असून इतरांनाही प्रशिक्षण देत असल्याचे तिने सांगितले आहे.

दफनभूमी ही अत्यंत शात जागा असून येथे माणसाला रिलॅक्स होता येते, शारीरिक हालचालींसाठी ही स्थिती अत्यंत चांगली मानली जाते. दफनभूमीत ट्रेनिंग करून मी शांततेसोबत निसर्गाशी जोडण्याची अनुभूती मिळवत असते. येथे स्वत:ला आरोग्यदायी करत मी मृत व्यक्तींना सन्मान आणि श्रद्धांजली देत असल्याचे एंड्रियाने म्हटले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article