For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सहलीच्या बसची टेम्पोला जोरदार धडक ,एक शिक्षक जागीच ठार तर एक शिक्षक जखमी

10:39 AM Dec 21, 2023 IST | Kalyani Amanagi
सहलीच्या बसची टेम्पोला जोरदार धडक  एक शिक्षक जागीच ठार तर एक शिक्षक जखमी

माळशिरस प्रतिनिधी

Advertisement

माळशिरस तालुक्यातील थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एसटी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस शिवाजी विद्यालय बावड्याची सहलीसाठी गेलेली बस कोल्हापूर येथून बावड्यासाठी परत निघाली होती. या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाट यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे तर शिक्षक बाळकृष्ण काळे हे जागेवरच मयत झाले आहेत. जखमी शिक्षकांना अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे. 108 ला कॉल आल्यानंतर वेळापूर आणि अकलूज या दोन ॲम्बुलन्स घटनास्थळी पाठवण्यात पाठवण्यात आल्या.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.