कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिव्यांग, आजारी शिक्षकांना जनगणनेतून वगळा

12:55 PM Sep 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिक्षक संघटना आक्रमक : तहसीलदार-जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारकडून सध्या जातनिहाय जनगणना सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. दिव्यांग, तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या शिक्षकांनाही इतर गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम देण्यात आल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी त्यांनी बेळगाव तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले. राज्यातील मागासवर्गीय समाजाची संख्या उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जातनिहाय जनगणना करण्यात येत आहे. या कामाला शिक्षकांना जुंपण्यात आले आहे.

Advertisement

निवडणूक अधिकारी (बीएलओ) म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांना सर्वेक्षणाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना शिक्षणाऐवजी इतर कामांमध्येच आपला वेळ घालवावा लागत आहे. ज्या शिक्षकांना चालणेही कठीण आहे, अशा दिव्यांग शिक्षकांना इतर विभागात सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या शिक्षकांनाही या कामात जुंपण्यात आले आहे. तसेच सर्वेक्षण करणे एका भागात असताना सरकारच्या लिंकमध्ये मात्र इतर ठिकाणी जबाबदारी दाखविण्यात येत आहे. या सर्व गोंधळामुळे शिक्षक वैतागले असून त्यांना यातून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बेळगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

तहसीलदारांच्या चेंबरसमोरच आंदोलन...

सरकारला शिक्षकांची बाजू समजावी यासाठी मंगळवारी बेळगाव तहसीलदार चेंबरसमोरच शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदारांनी शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केले. आजारी आणि दिव्यांग शिक्षकांना या कामातून न वगळल्यास आंदोलनाचा इशारा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळी यांनी दिला आहे.

जातनिहाय जनगणनेत अडथळा,लिंक ओपन होत नसल्याने शिक्षक वैतागले

बेळगाव जिल्ह्यात सोमवारपासून जात आणि जनगणनेला सुरुवात झाली. परंतु शिक्षकांना देण्यात आलेल्या लिंकमध्ये एरर येत असल्यामुळे जनगणना थांबली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही तांत्रिक समस्या आल्यामुळे जनगणनेला ब्रेक लागल्याचे चित्र दिसून आले. राज्य सरकारच्या सूचनेनुसार सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षण केले जात आहे. राज्यातील मागासवर्गीयांची संख्या निश्चित व्हावी, यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. परंतु शिक्षकांना सर्वेक्षणासाठी देण्यात आलेल्या लिंक खुल्या होत नसल्याचे समोर येत आहे. लिंकवर क्लिक केले असता एरर येत असून पुढील पेज ओपन होत नसल्याचे दिसत आहे. मंगळवारी शिक्षक संघटनेच्यावतीने याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. जनगणनेसाठी मोजकेच दिवस देण्यात आल्याने त्यामध्ये या तांत्रिक समस्येने विलंब होत आहे. त्यामुळे ही तांत्रिक समस्या वेळीच दूर करणे गरजेचे आहे. लिंक ओपन होत नसल्याबद्दल कोणत्याच विभागाला पूर्ण माहिती नसल्याने जनगणनेच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article