वारणा कुस्ती मैदानात आज चटकदार लढती
पृथ्वीराज पाटील-रवींद्र कुमार हरियाणा प्रमुख लढत: सुमारे दोनशे लढतींचे आयोजन
बेळगाव : वारणानगर येथील सहकार महषी तात्यासाहेब कोरे स्मृती आयोजित विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम 31 व्या अखिल भारतीय भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन शनिवार 13 डिसेंबर रोजी वारणा विद्यालय क्रीडांगणावरती केले आहे.
तात्यासाहेब कोरे यांच्या 31 व्या पुण्य स्मरणानिमित्त भारतातील एक सर्वश्रेष्ठ मैदानातील प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी, जागतिक पदक विजेता पृथ्वीराज पाटील कोल्हापूर आणि हिंदकेसरी, भारत केसरी रवींद्रकुमार हरियाणा यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्रकेसरी माऊली कोकाटे पुणे वि. कुमार भारत केसरी निशांत जाड हरियाणा यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर कोल्हापूर व हिंदकेसरी, भारत केसरी चिराग हरियाणा यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी दादा शेळके पुणे व भारत केसरी, जागतीक पदक विजेता इसाक चौधरी पंजाब यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय पदक विजेता सुबोध पाटील सांगली व भारत केसरी जसप्रीत पंजाब यांच्यात, सहाव्या क्रमांकाची लढत राष्ट्रीय पदक विजेता संदीप मोटे सांगली व यूपी केसरी मंगल ठाकूर हरियाणा यांच्यात होणार आहे.
या मैदानात प्रेक्षणीय कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कृष्णा पाटील वारणा व किरण गदगे सांगली, कृष्णा मुंडे रिंगेवाडी व गणात पाहुणे कराड, यश मगदूम कांडगाव व तेजस पाटील सुरत, निवास पवार सांगली व प्रताप माने कोपरर्डे, गणेश पाटील शिरोळ खुर्द व निखिल माने सांगली अशा लढती होणार आहेत. याशिवाय लहान मोठ्या 200 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात 40,000 प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.