For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेसोबत कराराचा उत्साह : सेन्सेक्स 368 अंकांनी तेजीत

06:17 AM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेसोबत कराराचा उत्साह   सेन्सेक्स 368 अंकांनी तेजीत
Advertisement

ट्रम्प यांच्या वक्तव्याचा परिणाम : बँकांचे समभाग मजबूत

Advertisement

मुंबई :

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिका आणि भारत यांच्यात करार लवकरच पुर्णत्वाला येईल असे वक्तव्य केल्याने भारतीय शेअरबाजारात याने उत्साह संचारला. सेन्सेक्स निर्देशांक 368 अंकांनी तेजीत राहिला होत. पीएसयु बँकेचा निर्देशांक बुधवारी चमकताना दिसला. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 368 अंकांच्या तेजीसोबत 84997 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 117 अंकांनी वाढत 26053 अंकांवर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रिज व आयसीआयसीआय बँक या समभागांनी बाजाराला तेजी राखण्यात मदत केली. सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, पॉवरग्रिड, अदानी पोर्टस, एचसीएल टेक व टाटा स्टील यांचे समभाग तेजीत होते. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, इटर्नल, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती सुझुकी व बजाज फायनान्स यांचे समभाग घसरणीत होते.

Advertisement

भारतीय शेअर बाजार बुधवारी दमदार तेजीसमवेत कार्यरत होता. एकावेळी सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला होता तर निफ्टी 26000 च्या स्तरावर पोहोचला होता. जागतिक सकारात्मक संकेत त्याचप्रमाणे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हची होणारी बैठक ज्यामध्ये दर कपातीची शक्यता आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील कराराला लवकरच अंतिम स्वरुप देणार असल्याच्या बातमीने शेअर बाजारामध्ये तेजी दिसली. बुधवारच्या सत्रामध्ये अदानी समूहातील समभाग तसेच एनटीपीसी आणि जेएसडब्ल्यू स्टील सारख्या दिग्गज कंपन्यांचे समभाग चार टक्क्यांपेक्षा अधिक मजबूत वाढीसह कार्यरत होते.

भारत आणि अमेरिका यांच्यातील करार लवकरच अंतिम होणार असल्याची बातमी शेअर बाजाराला बुधवारी धडकली. या संदर्भातले विधान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियामध्ये अपेक परिषदेत केले आहे. या त्यांच्या घोषणेनंतर भारतीय गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. या दरम्यान अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हची बैठक बुधवारी उशिरा होत असून त्यामध्ये दरामध्ये पाव टक्का कपात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीही खाली सरकत असल्याने त्याचाही परिणाम बाजारातील तेल कंपन्यांवर सकारात्मक दिसला आहे. याचदरम्यान मंगळवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 10,339 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत, जी जून 2025 नंतरची एकाच दिवसातली सर्वात मोठी खरेदी मानली जात आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या परतण्याने शेअर बाजाराला आणखी मजबुती प्राप्त होताना दिसत आहे.

Advertisement
Tags :

.