सीमा समन्वय बैठकीत माहितीची देवाण-घेवाण
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य बैठक
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आंतरराज्य सीमा समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत आंतरराज्य तपासणी नाके, जिह्यातील प्रलंबित अजामीन वॉरंट, भेटवस्तू साठा व वाटप, अवैध रोख रक्कम वाहतूक आणि मसल पावर गुंडाच्या माहितीची सीमेलगत असणाऱ्या कर्नाटक राज्याच्या जिल्ह्यातील पोलिसांच्याबरोबर देवाण-घेवाण केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी होते. सीमा समन्वय बैठकीला बेळगाव परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार विकास, बेळगाव शहर पोलीस आयुक्त यडा मार्टीन, कलबुर्गीचे पोलीस उपमहानिरीक्षक अजय कुमार हिलोरे, बेळगाव (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, विजापूरचे पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई, बिदरचे पोलीस अधीक्षक प्रदीप गुट्टी, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सोलापूर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोकर व कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई हे हजर होते.