कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किरकोळ अपवाद वगळता रंगोत्सव शांततेत

12:10 PM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चाकू हल्ल्यात वृद्ध तर विटांनी केलेल्या मारहाणीत तरुण जखमी

Advertisement

बेळगाव : काही किरकोळ घटना वगळता होळी व रंगोत्सव शांततेत पार पडला. होळीनिमित्त पार्टी करताना झालेल्या वादावादीनंतर महात्मा फुले रोड, शहापूर येथील एका वृद्धावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी यरमाळ रोड येथे ही घटना घडली. तर सदाशिवनगर येथे एकावर विटांनी हल्ला करण्यात आला आहे. प्रकाश चतुर (वय 64) रा. महात्मा फुले रोड, शहापूर असे चाकू हल्ल्यातील जखमीचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, बेळगाव ग्रामीणचे प्रभारी एसीपी जे. रघु, पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन घटनेसंबंधी माहिती घेतली.

Advertisement

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार होळीनिमित्त यरमाळ रोडवरील एका शेतवडीत शहापूरचे सात ते आठ जण पार्टी करीत होते. पार्टीत झालेल्या वादावादीनंतर अळवण गल्ली येथील एकाने आपल्या मुलाला बोलावून घेतले. त्यानंतर प्रकाश यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमी प्रकाश यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. याप्रकरणी अळवण गल्ली येथील विलास गावडे व त्यांचा मुलगा चेतन या दोघा जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सिव्हिल हॉस्पिटलबाहेर कार्यकर्त्यांचीही गर्दी जमली होती.

सदाशिवनगरमध्ये तरुणावर विटांनी हल्ला 

रंगोत्सवावेळी सदाशिवनगर येथील एकावर विटांनी हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सदाशिवनगर शेवटच्या बसस्टॉपजवळ ही घटना घडली आहे. शिवाजी परशराम जाधव (वय 42) असे जखमीचे नाव आहे. सुरुवातीला त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. सायंकाळी त्यांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. धर्मवीर संभाजी महाराजांवरील अत्याचाराचा उल्लेख करताच त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समजते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article