महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी

11:26 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश : 2014 पासून विविध शस्त्रक्रिया यशस्वी : शासनामार्फत मोफत उपचार

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

Advertisement

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी दरवर्षी प्रयत्न करण्यात येत आहेत. 2014 पासून या कार्यक्रमाअंतर्गत विविध शस्त्रक्रिया तसेच आरोग्याच्या इतर तक्रारी यावर शासनामार्फत मोफत उपचार केले जातात. शून्य ते 18 वर्षे वयोगटातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अशी माहिती खानापूर येथील राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. रविराज पै यांनी दिली.

खानापूर तालुका आरोग्य खात्याच्यावतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येत असून कणकुंबी येथील श्री माउली विद्यालयातील विद्यार्थ्यांची मंगळवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पै यांनी दिली. सरकारी व अनुदानित शाळा-कॉलेज तसेच अंगणवाडी, सरकारी हॉस्टेल यामध्ये आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांमध्ये असणारी कमतरता याची तपासणी करून आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य केंद्रात न होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सरकारशी करार केलेल्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येते.

त्यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत असून अद्याप तालुक्यातील जवळपास 30 टक्के शाळा पूर्ण झाल्या आहेत. दि. 1 जुलैपासून आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात येत असून डिसेंबरपर्यंत तालुक्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे, असेहे त्यांनी सांगितले. आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विविध संस्थांची मदत घेण्यात येते. शस्त्रक्रियेसाठी-सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट, चेहऱ्यावरील व्रणासाठी इंगा फाऊंडेशन, अपंगत्वासाठी-क्युअर आंतरराष्ट्रीय संस्था, ओठ, टाळू चिरणे या शस्त्रक्रियेसाठी-स्माईल ट्रेन असोसिएशन, आणि बधिरपणासाठी-इम्प्लांट प्रोजेक्ट या संस्थांची मदत घेण्यात येते.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या सुविधा पुढीलप्रमाणे : शारीरिक आरोग्य तपासणी, जन्मजात विकारांची तपासणी, वाढीचा आलेख तपासणी, वयानुरूप होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांची तपासणी, साध्या तसेच जटील शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात लाभ घेण्यासाठी शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचे नाव जवळच्या अंगणवाडीत नोंद असायला हवे. तसेच सरकारी अथवा अनुदानित शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळू शकतो. या योजनेच्या लाभासाठी बीपीएल, एपीएल रेशन कार्ड तसेच जातीचा दाखला, ग्रामीण किंवा शहरी भाग याचा काही संबंध नाही. प्रामुख्याने अपंगत्व दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया, बधीरपणा घालविण्यासाठी कानाची शस्त्रक्रिया, जन्मजात ओठ फाटलेला असणे, टाळू चिकटणे याबाबतच्या शस्त्रक्रिया, चेहऱ्यावरील प्लास्टिक सर्जरी अशा विविध शस्त्रक्रिया केल्या जातात.

गोल्याळी-तोराळीतील विद्यार्थ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया 

या उपक्रमांतर्गत कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या गोल्याळी शाळेतील स्वप्निल सागर गुरव, मल्लवा अनंत कांबळे, पूजा रामलिंग गुरव, दर्शना सागर गुरव व तेजल तानाजी गुरव आदी विद्यार्थ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच तोराळी येथील कृतिका व्यंकट पाटील हिची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तालुक्यातील लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रातील मीनाक्षी रामचंद्र जाधव, रामचंद्र देवानंद जाधव, रंजना देवानंद जाधव व आरती आप्पाजी जंगले या विद्यार्थ्यांचीसुद्धा मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती खानापूर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या नेत्र साहाय्यक नूतन अनगडकर यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article