महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्रासह 6 राज्यांतील 8 लोकसभा जागांचे ईव्हीएम तपासणार

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवडणूक आयोगाचा पहिल्यांदाच असा प्रयोग

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटले असले तरी काही मतदारसंघांमधून तक्रारी आलेल्या ठिकाणी आता निवडणूक आयोग पुन्हा ईव्हीएमची तपासणी करणार आहे. 6 राज्यांतील लोकसभेच्या 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामध्ये हरियाणातील दोन आणि छत्तीसगड, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणामधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर मतदारसंघातून आलेल्या तक्रारीनुसार तेथील ईव्हीएमची तपासणी होणार आहे.

महाराष्ट्रात अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या मागणीनुसार ईव्हीएमची तपासणी होणार आहे. विखे पाटील यांनी ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी केली होती. शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्याकडून त्यांचा सुमारे 29 हजार मतांनी पराभव झाला होता. तपासणी होणाऱ्या ईव्हीएमच्या बाबतीत 8 जागांपैकी भाजपने 3 तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या. तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करणारे 8 अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामध्ये ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर तपासण्याची मागणी करण्यात आली होती. आयोग आता 92 मतदान केंद्रांच्या ईव्हीएमची तपासणी करणार आहे. याशिवाय आयोगाने आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या 3 विधानसभा जागांच्या ईव्हीएम तपासण्याचे आदेश दिले आहेत. येथील 26 मतदान केंद्रांवरील ईव्हीएममधील गैरप्रकारांची आयोगाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

हरियाणातील कर्नाल आणि फरिदाबाद या जागांची ईव्हीएम तपासणी केली जाणार आहे. कर्नालमधून केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि फरीदाबादमधून केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. तसेच छत्तीसगडमधील कांकेर लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमची चाचणी होणार आहे. कांकेरमधून भाजपचे भोजराज नाग विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या बिरेश ठाकूर यांचा 1884 मतांनी पराभव केल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणुकीत अनियमितता झाल्याची भीती व्यक्त केली होती. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. याआधीही मतमोजणीच्या दिवशी फेरमतमोजणी झाल्याने या जागेचा निकाल उशिरा लागला होता. तर तामिळनाडूच्या वेल्लोर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ए. सी. षणमुगम यांनी ईव्हीएम तपासणीची मागणी केली आहे. येथे द्रमुकचे कथिर आनंद यांनी त्यांचा 2.15 लाख मतांनी पराभव केला. निवडणूक आयोग येथील 14 मतदान केंद्रांच्या ईव्हीएमची तपासणी करणार आहे.

ईव्हीएम तपासणीची अशी व्यवस्था पहिल्यांदाच

निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच ईव्हीएम तपासणीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मतमोजणीपूर्वी आयोगाकडून 1 जून रोजी आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला कोणताही उमेदवार ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज करू शकतो. यासाठी आयोगाकडून एक ईव्हीएम तपासण्यासाठी 50 हजार ऊपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र, यासाठी उमेदवाराने निकाल जाहीर झाल्यापासून 7 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article