महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा

11:00 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन 

Advertisement

पणजी : विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोचविण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. लोकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. राज्यातील प्रत्येक पंचायतीत सरकारची गाडी येईल आणि संबंधीत खात्याचे अधिकारी योजनांची माहिती देतील. 15 नोव्हेंबरपासून या उपक्रमाला सुऊवात झाली असली तरी लोकांचा म्हणावा तसा पाठींबा मिळत नसल्याचे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. पणजीत काल शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. पचांयत खात्याच्या संचालिका सिध्दी हर्ळणकर, सर्व तालुक्यांतील गटविकास अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. दक्षिण गोव्यात 31 तर उत्तर गोव्यात 19 डिसेंबरपर्यंत हा उपक्रम सुऊ रहाणार आहे. आतापर्यंत उत्तर गोव्यात 60 पंचायतीत तर दक्षिण गोव्यात 44 पंचायतीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. युवकांना स्वयंपूर्ण करणे, पारंपरिक व्यवसायाना नवी उर्जा प्राप्त करून देण्यासाठी सरकारने विश्वकर्मा योजना सुऊ केली आहे आत्तापर्यंत या योजने अंतर्गत 14 हजार लोकांनी नोंदणी केली आहे.

Advertisement

पेट्रोलगळती वाहिनी प्रकरणाची चौकशी होणार

वास्को येथील माटवे भागात पेट्रोल वाहिनीत गळती झाली असली तरी राज्यात पेट्रोलची टचांई होणार नाही. पेट्रोल गळती प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सदर वाहिनी निकामी झाल्याचे आढळून आले आहे. निकामी झालेल्या वाहिनीकडे संबंधितांनी लक्ष का दिले नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून त्याबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच पेट्रोल वाहिनी बदलण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article