महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महामेळावा खटल्यासंदर्भात 2 मार्चच्या सुनावणीला प्रत्येकाने हजर राहावे

10:53 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : म. ए. समितीच्या 2022 ला झालेल्या महामेळाव्यादिवशी महानगरपालिकेच्या तत्कालीन अभियंत्या मंजुश्री यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात केलेल्या फिर्यादीनुसार म. ए. समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले होते. जेएमएफसी-4 न्यायालयात खटला क्र. 146/2022 नुसार सुरू असलेल्या सुनावणीमध्ये दीपक अर्जुनराव दळवी, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश आप्पाजी मरगाळे, मदन बाबुराव बामणे, मनोहर कल्लाप्पा किणेकर, मालोजीराव शांताराम अष्टेकर, नेताजी नारायण जाधव, रणजीत बापुसाहेब चव्हाण, प्रकाश रामचंद्र शिरोळकर, सचिन शांताराम केळवेकर, सुनील महादेव बोकडे, सरिता विराज पाटील, रेणू सुहास किल्लेकर, श्रीकांत बाळकृष्ण कदम, दिलीप जोतिबा बैलूरकर, बापू वैजू भडांगे, राजू म्हात्रू चौगुले, बाबू माऊती कोले, राकेश रमेश पलंगे, शिवाजी केदारी सुंठकर, अनिल गुऊनाथ आंबरोळे, पियुष नंदकुमार हावळ, सूरज संभाजी कुडूचकर, दत्तात्रय अप्पय्या उघाडे, मनोहर लक्ष्मण हलगेकर, मनोहर आप्पाजी हुंदरे, सूरज नंदू कणबरकर, संतोष रमेश मंडलिक, धनंजय राजाराम पाटील यांचा समावेश आहे. बुधवारी या खटल्याची सुनावणी असताना अनेकजण गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी पुढील तारखेला सर्वजण हजर राहण्याबाबत सूचना केली असून गैरहजर राहणाऱ्यांना वॉरंट जारी करणार असल्याचे सांगितले आहे. पुढील तारीख 2 मार्च रोजी असून प्रत्येकाने हजर राहावे, असे आवाहन अॅड. महेश बिर्जे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article