For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात मोठी आतिषबाजी

06:09 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात मोठी आतिषबाजी
Advertisement

आकाशात  एक किलोमीटरपर्यंत फैलावतो प्रकाश

Advertisement

आकाशात आतिषबाजी पाहणे प्रत्येकालाच आवडत असते. फटाके फोडल्यावर आकाशात विखुरला जाणारा रंगबिरंगी आणि चमकदार प्रकाश मनाला भिडणारा असतो. योनशाकुदामा एक जपानी आतिषबाजी असून याला जगातील सर्वात मोठ्या आतिषबाजीपैकी एक मानले जात आहे. याची चमक आकाशात एक किलोमीटरपर्यंत फैलावू शकते. आता याच आतिषबाजीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ही आतिषबाजी कशी केली जाते आणि कशाप्रकारे याचा प्रकाश पूर्ण आकाशात फैलावतो हे दिसून येते. या व्हिडिओला आतापर्यंत 97 लाख ह्यूज मिळाले आहेत. काही लोक क्रेनच्या मदतीने योनशाकुदामा आतिषबाजी शैलला एका मोर्टार ट्यूबच्या आत टाकताना व्हिडिओच्या प्रारंभी दिसून येतात. हा शैल अत्यंत वजनी असतो. यानंतर हा शैल आकाशात जाऊन फुटतो, यामुळे निर्माण झालेली आतिषबाजी पाहण्याजोगी असते. ज्या शैलद्वारे ही आतिषबाजी केली जाते, त्याचे वजन 420 किलोग्रॅम इतके असते. या शैलला क्रेनद्वारे मोर्टार ट्यूबमध्ये लोड करण्यात आले आणि मग आकाशात सोडण्यात येते. योनशाकुदामा आतिषबाजी शैलच्या निर्मितीकरता एक वर्षाचा कालावधी लागत असतो.

Advertisement

योनशाकुदामा आतिषबाजी करण्यासाठी एकावेळी सुमारे 1 लाख 25 हजार रुपये इतका खर्च येत असतो. याचा शैल आकाशात 2700 फुटांच्या उंचीपर्यंत पोहोचून फुटू शकतो.  आतिषबाजीच्या बूमचा डायमीटर हा 2400 फुटांपेक्षाही अधिक असतो.

Advertisement
Tags :

.