दरवर्षी पूराचा फटका लोंढा येथील नागरिकांचा वाढतोय धोका
बेळगाव प्रतिनिधी- लोंढा येथे नदीकाठाला काहि घरांना दरवर्षी पूराचा फटका बसत आहे. मागील वर्षी महापूरामुळे अनेक घरे कोसळली. त्यांना सरकारने नुकसान भरपाई जाहिर केली आहे. मात्र जर पुन्हा घरे बांधली तर पुन्हा पूराचा फटका या घरांना बसणार आहे. तेंव्हा लोंढा गावातील नदी-काठावर असलेली गांधीनगर हि वसाहत इतरत्र स्थलांतरीत करावी, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. लोंढा गावातील गांधीनगर येथे जवळपास 30 हून अधिक घरे आहेत. त्यांना दरवर्षीच फटका बसत आहे. तर 127 घरांना या नदीचा धोका आहे. आता आम्हाला निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर घर पूर्ण बांधण्याची नोटिसहि दिली गेली आहे. जर घर बांधले नाहि तर ती रक्कम परत घेणार आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. जर या ठिकाणी घरे बांधली तर पुन्हा महापूराचा फटका घरांना बसणार आहे. त्यामुळे भितीचे वातावरण आले. 2019 पासून दरवर्षी आम्ही पूराचा फटका सहन करत आहे. तेंव्हा आम्हाला इतरत्र स्वतंत्र जागा द्यावी, जेणे करुन त्या ठिकाणी घरे बांधून आम्ही कायम स्वरुपी राहू, असेहि या निवेदनात म्हटले आहे. रेल्वे मार्ग करताना पूल बांधणयत आले आहे. मात्र तरी देखील त्यामधून पाण्याचा निचरा होणे अशक्य आहे. याचा सारासार विचार करुन आम्हाला तातडीने घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे. घरे मंजूर झालेल्यांनी 27 ऑक्टोबर पर्यंत घरे बांधावीत, असे म्हटले होते आणि हि नोटीस आम्हाला केवळ ८ दिवस आधी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही सर्व जण अडचणीत आलो आहे. तेंव्हा याचा सारासार विचार करुन आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करुन आम्हाला जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष चितळे, रामा होसमनी, जयश्री नायक, नजीर पठाण, बाबु जटकेकर, रजीया पठाण, बाळकृष्ण होसमनी, राजू कांबळे, लक्ष्मी तळवार यांच्यासह नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.