महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजही लॉकडाउनचे जीवन, मास्कचा वापर

06:27 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑनलाइन करतात शॉपिंग

Advertisement

2020-22 पर्यंतचा कालावधी हा लोकांसाठी अत्यंत आव्हानात्मक होता, लोकांनी स्वकीयांना गमाविले, घरांमधून बाहेर पडणे बंद केले होते. त्या काळात धान्यापासून गरजेच्या सर्व वस्तू ऑनलाइन मागविण्यात येत होत्या. हे सर्वकाही जीवघेण्याच्या विषाणूमुळे घडले होते. परंतु आता 2024 मध्ये स्थिती सुरळीत झाली आहे. कोरोनाचे संकट संपले आहे. लोकांचे जीवन रुळावर परतले आहे. परंतु इंग्लंडमधील एक कुटुंब अद्याप आजही त्याच लॉकडाउनप्रमाणे जगत आहे. हे कुटुंब 4 वर्षांपूर्वीच्या नियमांचे पालन करत आहे.

Advertisement

59 वर्षीय दांपत्य गॉर्डन-मँडी इंग्लंडच्या एसेक्समध्ये राहते. मँडी यांना एकूण 3 अपत्यं असून त्यांच्या सर्वात छोट्या मुलाचे नाव मॅसन असून तो 22 वर्षांचा आहे. हे कुटुंब आजही कोरोना लॉकडाउनदरम्यान पालन करण्यात आलेल्या नियमांना मानत आहे. हे कुटुंब अनेकदा हात धुत असतात, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करतात, घरासाठीचे धान्य ऑनलाइन मागवितात. हे सर्व काही ते मॅसन यांच्यासाठी करत आहेत.

लॉकडाउनसारखे आयुष्य

मॅसन याला क्रॉन नावाचा आजार असल्याचे निदान 2017 मध्ये झाले होते. या आजारात पोटापासून मलाशयापर्यंत रुग्णाच्या शरीरात प्रचंड वेदना आणि जळजळ होते.  तेव्हापासून त्याला कीमोथेरपीच्या टॅबलेटचे सेवन करावे लागते आणि दर 2 आठवड्यांनी त्याला इंजेक्शन घ्यावे लागते. यामुळे युवकाला लवकरच कुठलाही आजार होऊ शकतो.  त्याची रोगप्रतिकारकक्षमता अत्यंत कमी झाली असून तो सहजपणे कोविडचा शिकार ठरू शकतो. मुलाच्या सुरक्षेसाठी हे कुटुंब आजही नियमांचे पालन करते.

सुपरमार्केटमधून येणाऱ्या खाद्यवस्तूंना आम्ही स्वच्छत करतो, बाहेरील कुठल्याही गोष्टीला स्पर्श झाल्यावर हात धुवून घेतो. अनेकदा कोविडची चाचणी करवत असतो असे मँडी यांनी सांगितले आहे.

बाहेर पडणेच बंद

पूर्ण कुटुंब सदैव स्वत:च्या खिशात मास्क बाळगून असते. इतरांसाठी महामारी संपली असेल आणि ते स्वत:च्या जुन्या आयुष्यात परतले असतील, परंतु आमच्यासाठी आव्हाने त्याच प्रकारातील आहेत. माझ्या मुलाला ऑटिजम देखील आहे. याचमुळे तो अधिक लोकांच्या संपर्कात येत नाही आणि तो कुठे बाहेरही जात नाही. कोविडपूर्वी तो मित्रांसोबत बाहेर जायचा. फुटबॉल सामना पाहण्यासाठी जात होता. परंतु आता त्याचे आयुष्य बदलले आहे. त्याचमुळे आमचा मोठा मुलगा आणि मुलगी देखील घरी येऊ शकत नाहीत, ते आता अन्यत्र राहतात असे मँडी यांनी सांगितले आहे.

Advertisement
Next Article