For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवसंकल्पांना आकाशही पडे ठेंगणे

02:58 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवसंकल्पांना आकाशही पडे ठेंगणे
Advertisement

संकल्पांच्या पूर्ततेसाठी झटल्यास घडतात यशोगाथा : संकल्पबद्ध, ध्येयबद्ध समाजमन घडविते इतिहास

Advertisement

पणजी : काल रविवारच्या मावळतीच्या सूर्याला नमन करीत समस्त गोंयकार आणि गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी 2023 या वर्षाला गुडबाय करीत, 2024 या नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नव्या वर्षात अनेकांनी नवनवे संकल्प केले आहेत. नवी स्वप्ने पाहिलेली आहेत. काहींनी 2023 मध्ये पूर्ण न झालेल्या गोष्टी नव्या वर्षात साकार करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना गेले वर्ष चांगले गेले. त्यामुळे नव्या वर्षात त्यापेक्षाही अधिक चांगले आणि काहीतरी वेगळे करण्याचा संकल्प त्यांनी बाळगला आहे. संकल्प केला आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटलात तर या नवसंकल्पांना प्रसंगी आकाशही पडे ठेंगणे हे अनेक यशोगाथांनी दाखवून दिले आहे. अशाच काही मान्यवरांचे सर्वांना प्रोत्साहीत करणारे, मार्गदर्शन करणारे संकल्प...

सहकार्याचे शुभंकर हात एकमेकांत गुंफून नवे राष्ट्र घडवू या!

Advertisement

नव्या संकल्पाचा, नव्या आशा-आकांक्षांचा आणि मनाने नव्याने उभारी घेण्याचा दिवस. वैयक्तिक आकांक्षा जेव्हा राष्ट्रनिर्माणाच्या कार्यप्रणालीत गुंफल्या जातात, तेव्हा त्या त्या क्षणांना उन्नतीचा मार्ग गवसतो. उदात्तता प्राप्त होत असते. यातून नव्या पिढ्यांसाठी पथदर्शक दीपस्तंभ लाभत असतो. ज्ञानात्मक कक्षा ऊंदावत आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाने कल्पनेच्या पलीकडची झेप घेतली आहे. सहकार्याचे शुभंकर हात एकमेकांत गुंफून नवे राष्ट्र घडवू या!

 डॉ. सोमनाथ कोमरपंत, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक

चांगल्या विचारांत, चांगल्या कामात गुंतून राहणार

खरं तर आमचे नवीन वर्ष चैत्र महिन्यात सुरू होते. तरीसुद्धा नवीन पॅलेंडर वर्षात प्रवेश करताना आपण आपले कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे. सतत कुठल्या तरी कामात गुंतून राहून पुढे गेल्यास चांगल्या गोष्टी घडून येतात. मनात नेहमी सकारात्मक विचार आणणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपले आचारण चांगले होईल. विचार आणखी प्रगल्भ होतील. रिकामी राहिल्याने मनात नकारात्मक विचार प्रवेश करतात. त्यामुळे आपले कार्य सुरू ठेवणे गरजेचे आहे.

 पद्मश्री विनायक खेडेकर, ज्येष्ठ लोकजीवन अभ्यासक

साहित्याद्वारे वाचकाचे जीवन सुखमय व्हावे

नवीन पॅलेंडर वर्षाचा संकल्प म्हणजे, आपण आपले लेखन सुरूच ठेवून साहित्य निर्मितीला वाहून घेणार आहे. आपल्या साहित्याचे जेव्हा लोक वाचन करतील तेव्हा त्यांच्या तोंडावर एक स्मित हास्य दिसले पाहिजे. माझ्dया साहित्याने वाचकांचे अगोदर असलेले जीवन अधिक सुखमय व्हावे, हा विचार ध्यानात ठेवणार आहे. साहित्याने माणसामध्ये चैतन्य निर्माण होते, जीवनातील नैराश्य मिटून जाते. त्यामुळे नैराश्य दूर होईल, असे साहित्य निर्माण करण्यावर भर देणार आहे.

दामोदर मावजो, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक

नव्या शिक्षणपद्धतीसाठी, साहित्यासाठी कार्यरत राहणार

गोव्यात नवीन शिक्षणपद्धत सुरू होतेय. पायाभूत कार्यकरणीच्या समितीमध्ये मी आहे. नव्या शिक्षणपद्धतीची उत्तम पद्धतीने अंबलबजावणी झाली तर समाजाच्या, मुलांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी ती गुऊकिल्ली ठरणार आहे. त्यामुळे तिच्या अंबलबजावणी करण्यास वेळ देण्याचा संकल्प केलेला आहे. गोवा मराठी अकादमीच्या युवा विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमातून त्यांची कला, साहित्य ऊजविण्यासाठी कविता वाचन, लेखन, कविता, नृत्य नवीन उपक्रम करण्याचा  संकल्प देखील आहे.

 प्रा. अनिल सामंत, अध्यक्ष गोवा मराठी अकादमी

स्वप्ने सत्त्यात उतरतानाचा आनंद वेगळा

सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. क्रीडा क्षेत्रात कार्य करताना चांगले आरोग्य अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या नवीन वर्षात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच तुम्ही जे काही करता त्यात तुमचे सर्वोत्तम प्रयत्न देण्याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. माणसाने स्वप्नांचा पाठलाग करत राहणे गरजचे आहे. कारण स्वप्ने सत्यात उतरताना, बघताना आनंद मिळतो, त्यात जीवन जगण्याचा खरा आनंद मिळतो.

स्वप्नील अस्नोडकर, गोवा क्रीडा मुख्य प्रशिक्षक

कलासक्त युवकांनी कला जपण्यासाठी प्रयत्न करावे

कला क्षेत्र हे गोमंतकीय संस्कृतीचे प्रमुख अधिष्ठान आहे. अनेक गावांत परंपराधिष्ठीत अशा अनेक गोमंतकीय कला बदलत्या जीवनप्रवाहात लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. नवीन पॅलेंडर वर्षात कलासक्त अशा होतकरू युवकांनी ह्याबद्दल आस्थेने विचारमंथन करावे आणि अशा कला कालातीत राहण्यासाठी पुढाकार घेऊन कार्यरत रहायला हवे.

 गोविंद भगत, सूत्रसंचालक, व्याख्याता, सरकारी तंत्रनिकेतन, पणजी

जीवनात नाविन्य जपणे अत्यंत महत्वाचे

नवीन वर्ष म्हणजे नवी उमेद, नव्या आशा... हे नाविन्य जपणं हा खऱ्या अर्थाने  नववर्षाचा सुंदर संकल्प होऊ शकतो. सतत नवनवीन विचार आणि नवतेचा ध्यास असलेल्या व्यक्तीच आपलं भविष्य उज्वल आणि समृद्ध करू शकतात. उद्याच्या सुजलाम आणि सुफलाम राष्ट्रासाठी हेच नाविन्य अत्यंत महत्त्वाचे आहे. जीर्णपणाचा त्याग करून आनंदाचं आणि उत्साहाचं नवचैतन्य घेऊन आलेल्या या नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

परेश हनुमंत नाईक, साहित्यिक, मांद्रे-पेडणे

युवकांना गोव्यात राहूनच यशस्वी होणे शक्य

नवीन वर्षात युवकांनी केवळ सरकारी नोकरी किंवा इतर नोकरीमागे न लागता नवीन तसेच वेगळ्या व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करावा. गोवा हे प्रगतशील राज्य बनत असून, गोव्यात राहूनच युवक आपले भविष्य घडवू शकतात. राज्यात राहून भविष्य घडविण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तसेच राज्यातील युवक खरोखरच कुठलाही व्यवसाय करण्यास इच्छुक असेल तर त्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्याचे काम मी करू शकतो.

 दामोदर कोचकर, उद्योजक

वन्यजीवन संरक्षित राहणे आवश्यक

राज्यातील अजून बरेच वन्यजीव नमुने ओळखले गेले नाहीत. मोठ्या प्रमाणातील जंगलतोडीमुळे वन्यजीवांची वस्ती नष्ट होताना दिसत आहे. हे वन्यजीव आहेत, त्या वस्तीत, वातावरणात संरक्षित होणे गरजेचे आहे. यासाठी कुणी एकटा झटू शकत नाही. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी समजून या कार्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे. निसर्ग, प्राणी पर्यावरणाचे रक्षण करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. ज्यामुळे भावी पिढीसाठी पर्यावरण राखून ठेवले जाईल.

 अमृत सिंह, पर्यावरण तज्ञ

भारताला ‘युनिक’ भारत म्हणून ओळखले जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे तसेच त्यांनी घेतलेल्या अनेक कल्याणकारी निर्णयामुळे भारत विकसीत होत आहे. येणाऱ्या काळात जगात भारताला युनिक भारत म्हणून ओळखले जाईल. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात औद्योगिक क्षेत्राबरोबरच सर्वसामान्यांनाही पूरक व्यवसाय, उद्योग उभारणीस वाव मिळत आहे.  अनेक मोठे देश भारताशी करार व औद्योगिक संबंध प्रस्तापित करीत आहेत. याचा लाभ भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यास नक्कीच होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळेल, शिवाय बेरोजगारीही काही वर्षांत संपुष्टात येईल, अशी अपेक्षा आहे. राज्यातील विद्यार्थी व युवकांसाठी संदेश देताना एवढेच सांगेन की, नवीन शैक्षणिक धोरण अवलंबिले जात आहे. त्याचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन मल्टी लेव्हल स्कील प्राप्त करायला हवे.

 श्रीनिवास धेंपो, उद्योजक

वर्ष राष्ट्रीय ऐक्मयासाठी फार महत्त्वाचे असेल

नववर्ष हे भारतीय गणतंत्राचे 75 वे वर्ष आहे. 26 जानेवारी 2024 पासून आपण फार उत्साहाने ते साजरे करायला हवे, ह्याचा सरकार व समाजाला विसर पडला आहे. हे वर्ष मध्यपुर्व, हिंदी महासागरातील व उत्तर सीमेवरील अस्थिर परिस्थितीमुळे देशातील सर्व नागरिकांना स्थिर, कर्तव्य कठोर, मजबुत व ठाम निर्णय घेऊ शकणाऱ्या अशा केंद्र सरकारचा विचार लोकसभा निवडणुकीत करण्यास भाग पाडणार आहे. या वर्षात बाह्य शक्तीकडुन प्रेरीत अनेक हिंसक दहशतवादी कारवाया अपेक्षित आहेत. नागरिकांनी बचत केली पाहिजे. या लीप वर्षात नूतन विषाणू उपद्रवाबरोबर अनेक भयावह नैसर्गिक संकटे अपेक्षित आहेत. अखंड सावधानता बाळगून सर्व नागरिकांनी हे ऐतिहासिक वर्ष आपली घटनात्मक जबाबदारी ओळखून सुयोग्य ज्ञानाद्धारे देशासाठी दिले पाहिजे. 70 कोटी तरूणाईला हे आव्हानात्मक वर्ष आहे व त्यांनी हा देश सुरक्षित ठेवावा.

 डॉ. नंदकुमार कामत, ज्येष्ठ संशोधक

Advertisement
Tags :

.