महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विज्ञान युगातही समाज भोंदू बाबांच्या आहारी

11:07 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परिस्थिती बदलण्याची आवश्यकता : सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रा. संदीप जगताप यांचे विचार

Advertisement

बेळगाव : सत्तेवर येणाऱ्यांकडून योजनांची खैरात केली जात आहे. मात्र, या योजनांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणे अशक्य आहे. यासाठी ‘मी लिहिलेल्या कवितेला पुरस्कारापेक्षा वावरात बहरलेल्या पिकाला चांगला भाव मिळावा’ असे सांगत कवी प्रा. संदीप जगताप यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. विज्ञान युगातही समाज भोंदू बाबांच्या आहारी गेला आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य मराठी विकास संस्था अनुदान योजनेंतर्गत वाचनालयाच्या मराठी साहित्य काव्य विभागातर्फे ‘मनातल्या आणि मातीतल्या कविता’ या विषयावर ते बोलत होते. वाचनालयाच्या माई ठाकुर सभागृहात कार्यक्रम आयोजिला होता. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरुपा इनामदार, उपाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिझरे, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर उपस्थित होते.

Advertisement

सध्या समाजातील वैचारिक, सामाजिक अवस्था बदलणे गरजेचे आहे. तर सांस्कृतिक अवस्था टिकविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. समाज शिकून सुसंस्कृत झाला असला तरी अद्यापही वैचारिक अवस्था बदललेली नाही. अनेक भोंदू बाबांच्या आहारी जाऊन समाज भरकटत चालला आहे. ही चिंताजनक बाब आहे. सरकारकडून योजनांची खैरात केली जात असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे. एकीकडून सवलती दिल्या जात असल्या तरी दुसरीकडून त्या ओरबडून घेतल्या जात आहेत. याची जाणीव समाजाला होणे गरजेचे आहे. योजनांची खैरात करून शेतकऱ्यांची परिस्थिती बदलू शकणार नाही. समाजात शेतकऱ्यांची आत्महत्या व महिलांवरील अत्याचार रोखणे गरजेचे आहे. धर्मा-धर्मात भांडण लावून राजकारण केले जात आहे. यापेक्षा सर्वसमभाव ठेवून समाजाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकारणात चांगल्या लोकांची गरज

यासाठी राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. राजकारणाला दुय्यम लेखल्यास याचा फटका समाजालाच बसणार आहे. यासाठी किमान चांगल्या लोकांच्या पाठीशी तरी समाजाने उभे राहिले पाहिजे, असे कवी प्रा. संदीप जगताप यांनी यावेळी सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. विनोद गायकवाड म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत शोचनीय बाब आहे. सूत्रसंचालन प्रा. अशोक अलगोंडी यांनी करून आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article