70 टक्के शरीर भाजले तरीही...
कोलोराडोची डॅनेट बर्जलएफ-हागच्या घरात झालेल्या स्फोटाने सर्वकाही नष्ट झाले होते. तिच्या परिवाराने आयोवा येथील घरात मुलांसाठी एक पार्टी ठेवली होती. तेव्हाच फर्नेसच्या फॉल्टी वॉल्वमधून वायूगळती होऊ लागली, डॅनेटच्या आईने गरम पाण्याचा नळ चालू करताच पूर्ण घराला आग लागली होती. स्फोटांमुळे निर्माण झालेल्या ज्वाळांमध्ये डॅनेट सापडली होती. या दुर्घटनेत डॅनेट आणि तिचे वडिल गंभीर जखमी झाले होते. डॅनेटचे 70 टक्के शरीर यात होरपळले होते. डॅनेटला रुग्णालयात दाखल होत उपचारानंतर तिचा जीव वाचू शकला होता. मला तत्काळ ट्रेकियोस्टॉमी करत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मी अनेक महिन्यांपर्यंत बर्न सेंटरमध्ये होते आणि 20 वर्षे वयापर्यंत रुग्णालयाचे उंबरठे झिजवत होते. 30 हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या असून यातील बहुताश स्किन ग्राफ्टिंग होत्या असे डॅनेट सांगते.
आव्हानात्मक राहिले जीवन
या दुर्घटनेनंतर डॅनेटचे जीवन अत्यंत कठिण झाले, तिला स्कार-कवर्ड शरीर स्वीकारावे लागले. शाळेत असताना तिला प्रेशर गारमेंट, स्प्लिंट्स आणि फेस मास्क घालावा लागत होता, ज्यामुळे तिचे जीवन भावनात्मक स्वरुपात आव्हानात्मक झाले होते. स्वत:चे ब्युटी क्वीन होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मी समाजात कधीच फिट होणार नाही असे वाटत होते. परंतु 2019 मध्ये ब्यूटी पेजेंटमध्ये भाग घेतला. तीन वर्षांचा संघर्ष आणि आत्मस्वीकृतीनंतर मी मिसेस कोलोराडो झाल्याचे डॅनेटने सांगितले आहे.
समाजाला संदेश
मिसेस कोलोराडोचा पुरस्कार मिळाला तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला होता. एका दुर्घटनेत खूप काही गमावलेल्या त्या 10 वर्षीय मुलीसाठी देखील हे खूप काही होते. स्वत:ला पीडितेच्या स्वरुपात पाहणे सोडून दिले. दीर्घकाळापर्यंत पीडितेच्या लेबलखाली राहणे माझ्यासाठी योग्य नव्हते. मी बर्न सर्वाइवर असल्याचे गर्वाने सांगते. मी स्वत:च्या घावांना कमजोरीऐवजी शक्तीत बदलल्याचे डॅनेटचे सांगणे आहे.
लोकांसाठी ठरली उदाहरण
डॅनेट चार मुलांची आई असून पेशाने बालचिकित्सा नर्स तसेच लाइफ कोच आहे. तिने स्वत:च्या अनुभवांवर आधारित पुस्तक ‘ब्युटी फ्रॉम अॅशेज : ट्रान्सफॉर्मिग वूंड्स इनटु विजडम : स्कार्स इनटू स्टार्स’ लिहिले आहे. 43 वर्षांपासून लोक माझ्याकडे पाहत असतात, परंतु आता मी याला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते असे तिचे सांगणे आहे.